सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

नोव्हेंबर 2018 या महिन्यासाठीचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक

Posted On: 11 JAN 2019 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2019

 

नोव्हेंबर 2018 या महिन्यासाठी औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक 126.4 आहे. 2017 च्या नोव्हेंबर महिन्याशी तुलना करता यात 0.5 टक्के वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2017 च्या तुलनेत नोव्हेंबर 2018 मधे खाण क्षेत्राच्या निर्देशांकात 2.7 टक्के, उत्पादन क्षेत्रात उणे 0.4 टक्के तर विद्युत क्षेत्रात 5.1 टक्के वाढ झाली.

आधीच्या वर्षीशी तुलना करता नोव्हेंबर 2018 मधे वस्त्र प्रावरण उत्पादन उद्योग गटाने सर्वात जास्त म्हणजे 22.1 टक्के वाढ दर्शवली. त्यानंतर लाकूड आणि लाकडी सामान उत्पादन उद्योगाने 7.6 टक्के वाढ वृद्धी दर्शवली.

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1559656) Visitor Counter : 76


Read this release in: English