जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

देशात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध, प्रभावी जल व्यवस्थापन महत्वाचा घटक

Posted On: 11 JAN 2019 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2019

 

देशात पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध आहे. मात्र, मुख्य मुद्दा आहे तो प्रभावी जल व्यवस्थापनाचा, असे केंद्रीय जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यासमवेत गडकरी यांनी आज नवी दिल्लीत रेणुकाजी बहुउद्देशीय धरण प्रकल्पासाठीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या धरणामुळे या राज्यांमधली पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी मदत होणार आहे.

रेणूकाजी धरण प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या म्हणजे ऐतिहासिक क्षण आहे असे सांगून या करारासाठी लवकरात लवकर मंत्रिमंडळ मंजुरी देण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असल्याचे गडकरी म्हणाले. यमुना नदी आणि तिच्या टोंस आणि गिरी या उपनद्यांवर बांधण्यात येणाऱ्या तीन जलाशय प्रकल्पापैकी रेणूकाजी धरण प्रकल्प हा एक प्रकल्प आहे.

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1559644) Visitor Counter : 124


Read this release in: English