निती आयोग

नीती आयोगाच्या अटल नाविन्यता अभियानाद्वारे अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेचे प्रकाशन

Posted On: 11 JAN 2019 3:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जानेवारी 2019

 

नीती आयोगाच्या अटल नाविन्यता अभियानाद्वारे, राष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला ‘नई दिशाए, नये निर्माण, नया भारत’ या अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. या युवा दिनाचे औचित्य साधून देशभरात नाविन्यता, कल्पकता जोमाने बहरावी यासाठी पुस्तिका काढण्यात आली आहे.

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 10 महिन्यांच्या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली. अटल टिंकरिंग मॅरेथॉन 2017 मधल्या सर्वोच्च सहा नाविन्यपूर्ण आणि कल्पक उपक्रमांना मूर्त स्वरुप मिळावे आणि हे उत्पादन बाजारात येण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने निधीचं पूर्ण पाठबळ लाभलेला हा विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

अटल टिंकरिंग लॅब पुस्तिकेत, देशाच्या युवा संशोधकांचे अटल टिंकरिंग लॅब समवेतचे अनुभव मांडण्यात आले आहेत.

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1559606) Visitor Counter : 118


Read this release in: English