मंत्रिमंडळ

प्रगत मॉडेल एकल खिडकीच्या विकासावरील भारत आणि जपान यांच्यातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 JAN 2019 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रगत मॉडेल एकल खिडकी’च्या विकासावरील भारत आणि जपान यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

लाभ :

या करारामुळे व्यापार परिचालनासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियांसाठी प्रगत मॉडल एकल खिडकीचा विकास आणि भारतात केंद्र आणि राज्‍य सरकारांमध्ये यावर क्रियान्वयनासाठी सहकार्य सुनिश्चित होईल. तसेच याबरोबर एक असा आकृतिबंध विकसित करण्यासाठी उभय देशांदरम्यान सहकार्य शक्य होईल ज्यायोगे या प्रक्रिया त्वरित पूर्ण केल्या जाऊ शकतील. आणि व्यापार सुलभतेला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना वेग येईल. ‘प्रगत मॉडल एकल खिडकी’ देशात आणि देशाबाहेरील सर्वोत्तम पद्धतींवर आधारित आहेत. यामुळे गुंतवणूक करणे सुलभ होईल.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1559580) Visitor Counter : 102


Read this release in: English