मंत्रिमंडळ

भारत आणि डेन्मार्क यांच्यात सागरी मुद्यांवरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 JAN 2019 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत भारत आणि डेन्मार्क यांच्यात सागरी मुद्यांवरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली. डेन्मार्कच्या डब्ल्यूआयपी जानेवारी 2019 मधील आगामी दौऱ्यादरम्यान या करारावर स्वाक्षरी करण्याचा प्रस्ताव आहे.

लाभ:

या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय सहकार्य क्षेत्रात नव्या संधींचा शोध घेण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

  • भारत आणि डेन्मार्कच्या सागरी क्षेत्रांदरम्यान सीमापार सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी मदत होईल.
  • दोन्ही देशांना गुणवत्‍तापूर्ण वाहतूक  सुनिश्चित करण्यासाठी परस्परांच्या क्षमता सुधारण्यासाठी तज्ञ, प्रकाशन, माहिती,डाटा आणि सांख्यिकी आदान-प्रदान , हरित सागरी तंत्रज्ञान आणि जहाजबांधणी  क्षेत्रात सहकार्य, भारताच्या शिपिंग नोंदणी कार्यालयाला मान्‍यता प्राप्‍त संसंघटनेचा दर्जा प्रदान करणे आणि सागरी  प्रशिक्षण आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यात समर्थ बनवेल.
  • मर्चेंट शिपिंग आणि सागरी वाहतूक संबंधित क्षेत्रात निरंतर सहकार्यासाठी संशोधन आणि विकास
  • द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही स्तरावर उभय देशांसाठी परस्पर लाभासाठी सहकार्य वृद्धिंगत करेल.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 



(Release ID: 1559577) Visitor Counter : 80


Read this release in: English