पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय
देश हागणदारीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाची योग्य दिशेने वाटचाल
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2019 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2019
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत 5.4 लाख गावे आणि 585 जिल्हे हागणदारीमुक्त जाहीर झाले आहेत. 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. देशाच्या ग्रामीण भागात 9 कोटीपेक्षा जास्त स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. यामुळे ग्रामीण भागात स्वच्छतेचे जाळे 2014 मधल्या 39 टक्क्यांवरुन आता 98 टक्क्यांवर पोहोचले आहे. राष्ट्रीय वार्षिक ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2017-18 अंतर्गत 6000 गावातल्या 90,000 घरात यासंदर्भात पडताळणी करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागात स्वच्छतागृहांचा वापर 93.4 टक्के झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय दोन स्वतंत्र सर्वेक्षणही करण्यात आली त्यामध्येही या स्वच्छतागृहांचा वापर 91 टक्के आणि 95 टक्के हेात असल्याचे निदर्शनाला आले आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत देश हागणदारीमुक्त करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या चेंजेस इन ओपन डिफेकेशन इन रुरल नॉर्थ इंडिया 2014-18 या नुकत्याच झालेल्या अभ्यास अहवालात काही माहिती दिशाभूल करणारी असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चुकीच्या विसंगत माहितीवर आधारित अभ्यास अहवाल वाचकांची दिशाभूल करणारे ठरू शकतात याकडे मंत्रालयाने लक्ष वेधले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1559235)
आगंतुक पटल : 308
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English