पंतप्रधान कार्यालय

कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 08 JAN 2019 9:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2019

 

कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टीफन हार्पर यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. रायसीना चर्चेत सहभागी होण्यासाठी हार्पर भारतात आले आहेत.

भारत-कॅनडा संबंधांचा विकास, जागतिक स्तरावरचे मुख्य मुद्दे, लोकशाहीमधले सहकार्य यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1559225) Visitor Counter : 85


Read this release in: English