पंतप्रधान कार्यालय

4 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधान मणिपुर आणि आसामला भेट देतील


इम्फाळमधील अनेक प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन आणि भूमिपूजन

Posted On: 03 JAN 2019 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जानेवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 जानेवारी 2019 रोजी मणिपूर आणि आसामला भेट देणार आहेत.

मणिपूरमध्ये पंतप्रधान अनेक प्रकल्प व योजनांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. मोरेह येथील एकीकृत चेक पोस्ट (आयसीपी), दोलाईथाबी बॅरेज योजना, साओं मबंग येथे एफसीआय खाद्य भंडारण गोदाम, थंगलसुरुंगंद येथे इको टुरिझम कॉम्प्लेक्स तसेच विविध पाणीपुरवठा योजनांचा यामध्ये समावेश  आहे. फलकाचे अनावरण करून पंतप्रधान या योजनांचे उद्‌घाटन करतील.

400 किलो व्हॅट क्षमतेची डबल सर्किट सिलचर-इंफाल लाइन पंतप्रधान देशाला समर्पित करेल.

इंफाळच्या धनमंजुरी विद्यापीठाचा पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा सुविधा आदी प्रकल्पांचे भूमीपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. इंफाळच्या पूर्व जिल्ह्यातील हपताकंजीबंग येथील बैठकीला ते संबोधित करतील.

असममध्ये पंतप्रधान सिलचरमधील रामनगर येथे सार्वजनिक रैलीला ते संबोधित करतील.

 

 

N.Sapre/ S. Tupe/D. Rane



(Release ID: 1558629) Visitor Counter : 75


Read this release in: English