पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान अंदमानमध्ये


पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलला भेट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुष्पगुच्छ वाहून श्रद्धांजली

भारतीय भूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रोवलेल्या तिरंगा झेंडा प्रसंगाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित

Posted On: 30 DEC 2018 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्ट ब्लेअर इथे अंदमान-निकोबार बेटाला भेट दिली. पोर्ट ब्लेअरमध्ये त्यांनी सैनिकांना त्यांच्या शौर्याप्रित्यर्थ पुष्पांजली अर्पण केली आणि सेल्युलर जेलला भेट दिली. सेल्युलर जेलमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या कोठडींना भेट दिली. तसेच त्यांनी भारताचा तिरंगा उंच फडकावून नेताजी सुभाष चंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय भूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रोवलेल्या तिरंगा झेंडा प्रसंगाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी टपाल विभागातर्फे जारी केलेल्या स्मृति तिकीट, नाणं आणि ‘फस्ट डे कव्हर’ जारी केले.

त्यांनी ऊर्जा संलग्नता आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांच्या मालिकांचे अनावरण केले.

या प्रसंगी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, अंदमान आणि निकोबार बेट हे केवळ भारतीय नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिक नसून, भारतीयांसाठी ते तीर्थक्षेत्रासमान आहे. हे बेट आपल्याला सदैव आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्रितपणे स्वातंत्र्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची आठवण करुन देते. सरकारने या बेटाचा विकास करण्याचे आश्वासन दिले असून, शिक्षण, आरोग्य, संलग्नता, पर्यटन आणि रोजगार या क्षेत्रात वरील विकासात्मक प्रकल्प कार्यरत राहणार असून, आजच्या प्रकल्पांच्या अनावरणाचा कार्यक्रम हा वरील प्रकल्पांच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठीची सुरुवात आहे.

ते पुढे म्हणाले की, सेल्युलर जेलला त्यांची भेट आणि ज्या ठिकाणी 75 वर्षापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकवला होता, ते ठिकाण सदैव लक्षात राहिल. ते पुढे म्हणाले की, सेल्युलर जेलच्या ठिकाणी हजारो स्वातंत्र्य सैनिकांना स्वातंत्र्याच्या लढ्यात त्रास सहन करावा लागला, ते ठिकाण माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासमान आहे. राष्ट्र कधीही स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग विसरणार नाही.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मरण करतांना पंतप्रधान म्हणाले की, नेताजींच्या एका हाकेसरशी अंदमानमधील बहुसंख्य युवकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रित येऊन प्राणार्पण केले. 150 फूट उंचीचा फडकणारा ध्वज सदैव 1943 च्या या दिवशीची आठवण करुन देईल.

या प्रसंगी त्यांनी रॉस बेटला नेताजी सुभाषचंद्र बोस द्विप, नेल बेटला शहीद द्विप आणि हावलॉक बेटला स्वराज द्विप असे पुनर्नामकरण केले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, आज भारतीय नेताजींच्या दृष्टीकोनातून सशक्त भारत बनवण्यासाठी कार्यरत आहेत.

देशात सर्वदूर परस्पर जोडणी बळकट करण्यासाठी सरकार कार्यरत असून, आपल्या नेत्यांचा सन्मान आणि स्मरण तसेच एकात्मतेसाठी आपल्या भावना बळकट बनवण्यासाठी सरकार मदत करत आहे. ते पुढे म्हणाले की केंद्र सरकार इतिहासातल्या प्रत्येक तेजस्वी घटना प्रकाशझोतात आणण्यासाठी प्रयत्नशील असून, याबाबतीत बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित पंचतीर्थवर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांच्या नावांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे.

पर्यावरणाच्या आवश्यकतेनुसार पोर्ट ब्लेअरमधील बेट विकसित करण्याचे आश्वासन सरकारने दिले असून, पर्यावरण खाद्य प्रक्रिया उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रावर विशेष जोर देण्यात येणार आहे.

 

 

B.Gokhale/D. Rane



(Release ID: 1558417) Visitor Counter : 79


Read this release in: English