मंत्रिमंडळ
विजया, देना आणि बँक ऑफ बडोदा यांच्या विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी, भारतीय बँकिंग व्यवस्थेत प्रथमच तीन प्रकारे विलीनीकरण
Posted On:
02 JAN 2019 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून बँक ऑफ बडोदा हस्तांतरी (ट्रान्सफरी) बँक तर विजया बँक आणि देना बँक हस्तांतरक (ट्रान्स्फरर) बँका असतील.
भारतातील बॅंकांचे हे पहिलेच त्रिपक्षीय विलीनीकरण असेल. विलीनीकरणांनंतर ही बँक देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक बनेल.
विलीनीकरणामुळे जागतिक स्तरावर मजबूत स्पर्धात्मक बँक तयार करण्यास मदत मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर समन्वय साधण्यास सक्षम होईल. परस्परांचे बँकिंग जाळे, कमी खर्चाच्या ठेवी आणि तीन बँकांच्या सहायक संस्थांचा लाभ मिळेल आणि ग्राहक आधार, बाजार पोहोच, परिचालन कार्यक्षमता, अनेक उत्पादने आणि सेवा तसेच ग्राहकांच्या एकत्रित प्रवेशासाठी एकत्रित अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सहकार्य करण्याची क्षमता यात आहे.
विलीनीकरण योजनेचे प्रमुख मुद्दे
- विजया बँक आणि देना बँक हस्तांतरणकर्ता बँक आहेत तर बँक ऑफ बडोदा हस्तांतरित बँक आहे.
- योजना 1.4.2019 पासून लागू होईल.
- योजना सुरु झाल्यानंतर हस्तांतरणकर्ता बँकांचे सर्व व्यवसाय हस्तांतरित बँकेला हस्तांतरित केले जातील आणि हस्तांतरित बँकेकडे सर्व व्यवसाय मालमत्ता, अधिकार, स्वामित्व, दावे,परवाने, मान्यता, अन्य विशेषाधिकार आणि सर्व संपत्ती, देणी, दायित्व असतील.
- हस्तांतरणकर्ता बँकेचे सर्व स्थायी आणि नियमित अधिकारी किंवा कर्मचारी हस्तांतरित बँकेत अधिकारी आणि कर्मचारी असतील. हस्तांतरित बँकेत त्यांच्या सेवांसाठी दिले जाणारे वेतन आणि भत्ते हस्तांतरणकर्ता बँकांच्या वेतन आणि भत्त्यांपेक्षा कमी आकर्षक नसतील.
- हस्तांतरित बँकांचे मंडळ हे सुनिश्चित करेल की हस्तांतरित होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हित सुरक्षित असेल.
- हस्तांतरित बँक हस्तांतरणकर्ता बँकेच्या भागधारकांना समभाग अदला-बदली गुणोत्तरानुसार समभाग जारी करेल. यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या तज्ञ समितीच्या माध्यमातून मांडता येतील.
विलीनीकरणानंतर बँकांचे सामर्थ्य
विलीनीकरणानंतर बँक वाढत्या अर्थव्यवस्थेच्या कर्जविषयक गरजा पूर्ण करणे, आघात सहन करणे आणि संसाधन वाढवण्याची क्षमता पूर्ण करण्यात उत्तम प्रकारे सज्ज असेल. बँकेचा वाढता व्यवसाय आणि नफा, व्यापक उत्पादन, तंत्रज्ञानाचा अवलंब शक्य होईल आणि व्यापक पोहोचच्या माध्यमातून खर्च कमी होईल, जोखीम व्यवस्थापन सुधारेल आणि आर्थिक समावेशकता वाढीला लागेल.
विलीनीकरणामुळे जागतिक बँकांच्या तुलनेत मोठ्या बँकेची निर्मिती होईल इ भारतात आणि जगात स्पर्धा करायला सक्षम असेल.
वैयक्तिक बँकांचे सामर्थ्य उदा. कमी खर्चात कासा ठेवी मध्ये देना बँकेची पोहोच, विजया बँकेचा नफा आणि भांडवल उपलब्धता तसेच बँक ऑफ बडोदाची व्यापकता, जागतिक जाळे, संचालन क्षमता आणि व्यापक उत्पादने आणि सेवा देण्याबाबत लाभ होईल.
विलीनीकरणामुळे गुणवत्तेचे मोठे भांडार प्राप्त होईल आणि मोठा डाटाबेस मिळेल ज्याचा लाभ वेगाने डिजिटलाईज्ड होणाऱ्या बँकिंग प्रणालीत स्पर्धात्मक लाभ उठवण्यासाठी होईल.
जनतेला मजबूत नेटवर्कच्या माध्यमातून व्यापक बँकिंग सेवा उपलब्ध होतील आणि कर्ज सहजपणे उपलब्ध होईल.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1558292)
Visitor Counter : 283