मंत्रिमंडळ

चंदीगड प्रशासनाच्या 3930 कर्मचाऱ्यांसाठी स्वयं वित्तपुरवठा गृहनिर्माण योजनेअंतर्गत गृहनिर्माणासाठी चंदीगड गृहनिर्माण मंडळाला भूखंड द्यायला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 02 JAN 2019 7:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

चंदीगड प्रशासनाच्या 3930 कर्मचाऱ्यांसाठी स्वयं वित्तपुरवठा गृहनिर्माण योजनेअंतर्गत गृहनिर्माणासाठी चंदीगड गृहनिर्माण मंडळाला भूखंड द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

चंदीगड प्रशासन कर्मचाऱ्यांच्या 3930 घरांसाठी 73.3 एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे त्यापैकी 11.8 एकर जमीन चंदीगड गृहनिर्माण मंडळाच्या ताब्यात आधीपासूनच आहे. 61.5 एकर सरकारी जमीन चंदीगड गृहनिर्माण मंडळाला द्यायचा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावामुळे कामगार आणि स्थानिक अभियंता वर्गासाठीही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1558275) Visitor Counter : 69


Read this release in: English