आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

कुटुंब कल्याण आणि आरोग्यविषयक इतर उपक्रमांसंदर्भातील अंब्रेला योजना सुरूच ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 02 JAN 2019 6:26PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

कुटुंब कल्याण आणि इतर आरोग्य उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या पाच योजना, चौदाव्या वित्त आयोगाच्या 2017-18 ते 2019-20 या काळात सुरू ठेवायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

खर्च- चौदाव्या वित्त आयोगाच्या 2017-18 ते 2019-20 या काळात या योजनांसाठी 2381.84 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकार 100 टक्के निधीची व्यवस्था करणार आहे.

लाभ – अल्प उत्पन्न गटासाठी गर्भनिरोधकांचा मोफत पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र ही योजना विशिष्ट गट अथवा विशिष्ट वर्गापुरती मर्यादित नसून देशभरातल्या सर्व जनतेसाठी आहे.

स्वस्थ नागरिक अभियान, गर्भनिरोधकाचा मोफत पुरवठा, आरोग्य सर्वेक्षण आणि आरोग्य संशोधन, गर्भनिरोधकांचे सोशल मार्केटींग, लोकसंख्या संशोधन केंद्र या पाच योजनांचा यात समावेश आहे.

प्रभाव- राष्ट्रीय धोरण 2017 चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टासंदर्भात आंतरराष्ट्रीय कटिबद्धतेच्या दृष्टीने या पाच योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1558244) Visitor Counter : 131


Read this release in: English