संरक्षण मंत्रालय

माझगाव गोदी

Posted On: 02 JAN 2019 5:51PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल)मध्ये स्थायी पदांसाठी रिक्त जागा आहेत.

एक्झीक्युटिव्ह अर्थात कार्यकारी पदासाठी 173 जागा आहेत. माझगाव गोदीत गेल्या 10 वर्षापासून काही कुशल कामगार काम करत आहेत मात्र यासंदर्भात कायमस्वरुपी पदे रिक्त नाहीत.

आऊटसोर्स तत्त्वावर काम करण्यासंदर्भात माझगाव गोदीने 3-1-2018 ला खुल्या निविदा काढल्या होत्या. आवश्यक त्या प्रक्रियेनंतर 4-9-2018 ला एजन्सीला यासंदर्भात ऑर्डर काढण्यात आली.

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. अरविंद सावंत यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1558212) Visitor Counter : 127
Read this release in: English