गृह मंत्रालय

बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आलेल्या संघटना

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2019 5:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

केंद्र सरकारने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) नॅशनल लिबरेशन फ्रंट इन त्रिपुरा (एनएलएफटी), ऑल त्रिपुरा टायगर फोरम (एटीटीएफ) या संघटना बेकायदेशीर असल्याची खातरजमा झाल्यानंतर गेल्या तीन वर्षात या तीनही संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे जाहीर केले आहे.

भारतीय उपखंडात 1) अल कायदा आणि या संघटनेचे कोणतेही स्वरुप, 2) खोरासन प्रांतातली इस्लामिक स्टेट, आयएसआयएस विल्यात खोरासन, इस्लामिक स्टेट ऑफ इराकआणि शाम-खोरासन (आयएसआयएस-के) आणि त्याचे कोणतेही स्वरुप 3) खलिस्तान लिबरेशन फोर्स आणि या संघटनेचे कोणतेही स्वरुप या संघटना दहशतवादी कारवायात गुंतल्याची खात्री पटल्यानंतर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या पहिल्या शेड्यूलमध्ये गेल्या तीन वर्षात सरकारने त्यांचा समावेश केला आहे.

या कायद्याअंतर्गत प्रतिबंधित संघटनांच्या यादीतून कोणत्याही संघटनेचे नाव हटवण्यात आलेले नाही.

बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या तीन वर्षात 418 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज राज्‍यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1558186) आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English