पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

स्वयंपाकाच्या गॅस अनुदानाच्या थेट लाभ हस्तांतरण योजनेत 23.24 कोटी ग्राहक सहभागी

Posted On: 02 JAN 2019 2:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 जानेवारी 2019

 

‘पहल’ योजनेअंतर्गत एलपीजी ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. आधारमार्फत एटीसी किंवा बँक खात्याशी संबंधित बीटीसी मार्फत हे अनुदान जमा केले जाते. 25.17 कोटी एलपीजी ग्राहकांपैकी 28/12/2018 पर्यंत 23.24 कोटी ग्राहक पहल योजनेत सहभागी झाले असून नोंदणीकृत बँक खात्यामार्फत हे ग्राहक अनुदान घेत असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1558112)
Read this release in: English