अर्थ मंत्रालय

डिसेंबर 2018 मधले वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन

Posted On: 01 JAN 2019 6:01PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2019

 

2018 च्या डिसेंबरमध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन 94,726 कोटी रुपये राहिले. यामध्ये सीजीएसटी 16,442 कोटी, एसजीएसटी 22,459 कोटी, आयजीएसटी 47,936 कोटी, (आयातीवरच्या 23,635 कोटींसह) आणि उपकर 7,888 कोटी (आयातीवरच्या 838 कोटींसह) रुपये होता. नोव्हेंबर महिन्यासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत 72.44 लाख जीएसटीआर 3B विवरणपत्र भरण्यात आली.

महसुलासंदर्भातल्या नियमित पूर्ततेनंतर डिसेंबर 2018 मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सीजीएसटीसाठी 43,851 कोटी रुपये तर एसजीएसटीसाठी 46,252 कोटी रुपयांच्या एकूण महसुलाची कमाई केली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1558078) Visitor Counter : 144


Read this release in: English