वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

कृषी निर्यात विभाग

Posted On: 01 JAN 2019 1:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 1 जानेवारी 2019

 

विशिष्ट उत्पादनाशी संबंधित बाबींवर सर्वंकष दृष्टीक्षेप रहावा आणि निर्यातीच्या दृष्टीने सर्व बाबींचा विकास व्हावा यासाठी 2001 मध्ये एईझेड अर्थात कृषी निर्यात विभाग निर्माण करण्यात आले. मात्र हे विभाग अपेक्षित उद्दिष्ट साध्य करत नसल्याचे 2004 च्या डिसेंबरमध्ये घेतलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले. त्यामुळे नवे कृषी निर्यात विभाग स्थापन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिसूचित सर्व कृषी निर्यात विभागांनी पाच वर्षाचा नियोजित कालावधी पूर्ण केल्यामुळे त्यांचे काम थांबवण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या आठ एईझेडचा समावेश आहे. द्राक्ष आणि द्राक्ष वाईनसाठी नाशिक, सांगली, पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्हा, हापूस आंबा (अल्फान्सो)साठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्हा. केशर आंब्यासाठी औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर आणि लातूर. फुलांसाठी पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली. कांद्यासाठी नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, जळगाव आणि सोलापूर. डाळींबासाठी सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे, नाशिक, लातूर आणि उस्मानाबाद. केळ्यासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलडाणा, वर्धा, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा तर संत्र्यांसाठी नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातल्या एईझेडचा यात समावेश आहे.

20 राज्यातले 60 एईझेड प्रकल्प 2004-05 पर्यंत अधिसूचित करण्यात आले होते.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1558022)
Read this release in: English