विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारीला पंजाबमधल्या जालंधर येथे 106 व्या भारतीय विज्ञान काँग्रेस-2019 चे उद्‌घाटन करणार


विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासह केंद्रीय मंत्री जगभरातले प्रख्यात शास्त्रज्ञ, नोबेल पुरस्कार विजेते परिषदेला उपस्थित राहणार

Posted On: 30 DEC 2018 5:16PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2018

 

पंजाबमधल्या जालंधर येथे 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत जगातल्या सर्वात मोठी विज्ञान परिषद ‘भारतीय विज्ञान काँग्रेस 2019’चे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारीला ‘भविष्यातील भारत: विज्ञान आणि प्रौद्योगिकी’ या संकल्पनेला वाहिलेल्या यंदाच्या 106 व्या भारतीय विज्ञान काँग्रेस 2019 चे उद्‌घाटन करतील. परिषदेला उपस्थित 30,000 प्रतिनिधींना पंतप्रधान संबोधित करतील. परिषदेला अनेक नोबेल पुरस्कार विजेते, धोरणकर्ते, प्रशासक, प्रख्यात शास्त्रज्ञ, युवा संशोधक, शालेय विद्यार्थी उपस्थित राहतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासह केंद्रीय मंत्रीही या परिषदेला उपस्थित राहतील.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ समाजातल्या वंचित घटकांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या काय केले जात आहे आणि आणखी काय करता येऊ शकेल, यादृष्टीने ही परिषद सहाय्यक ठरेल, असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

 

B.Gokhale/S.Kakde/P.Kor


(Release ID: 1557911) अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein: English