पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा गाझीपूर दौरा


महाराजा सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 29 DEC 2018 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरला भेट दिली. महाराजा सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीटाचे पंतप्रधानांनी प्रकाशन केले. गाझीपूर इथे त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजनही केले.

विविध कार्यक्रमात आज अनावरण करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये ‘पूर्वांचल एक वैद्यकीय केंद्र’. तसेच कृषी क्षेत्रातल्या संशोधनासाठीचे केंद्र ठरण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत.

महाराजा सुहेलदेव हे एक शूर योद्धा होते, त्यांनी जनतेला सदैव प्रेरणा दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. महाराजा सुहेलदेव यांच्या युद्धविषयक, धोरणविषयक आणि प्रशासकीय कौशल्ये पंतप्रधानांनी विषद केली. भारताच्या संरक्षण आणि सामाजिक जीवनात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीत्वांचा वारसा जतन करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार जनतेच्या चिंताबाबत संवेदनशील आहे. प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्ण जीवन लाभावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

आज पायाभरणी करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे या भागाला आधुनिक आरोग्यसुविधा उपलब्ध होतील. या प्रदेशातल्या जनतेची ही दीर्घकालीन मागणी होती आणि आता लवकरच याची वास्तवात पूर्तता होणार आहे. या भागातल्या आरोग्यसुविधा सुधारण्यासाठीच्या अनेक महत्वाच्या रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे. यासंदर्भात गोरखपूर आणि वाराणसी इथे होणाऱ्या रुग्णालयांचाही त्यांनी उल्लेख केला.

केंद्र सरकारतर्फे स्वातंत्र्यानंतर प्रथमच आरोग्यसेवांवर इतके अधिक लक्ष दिले जात आहे. आयुष्मान भारत योजना आणि रुग्णांच्या उपचाराबाबतही त्यांनी उल्लेख केला. केवळ 100 दिवसात सहा लाखापेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सुरु केलेल्या विमा योजनांचा त्यांनी उल्लेख केला, जीवन ज्योती किंवा सुरक्षा विमा योजनेत, देशात वीस कोटीपेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत.

या भागातल्या कृषी क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. यामधे वाराणसीमधल्या आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था, वाराणसी आणि गाझीपूरमधल्या कार्गो केंद्राचा, गोरखपूर इथल्या खत प्रकल्पाचा, बाणसागर इथल्या सिंचन प्रकल्पाचा समावेश आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असून, त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे.

केवळ तात्कालिक राजकीय फायद्यासाठी उचललेल्या पावलांमुळे देशातल्या जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होत नाही. केंद्र सरकारने 22 पिकांसाठी खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली.

दळणवळणाशी संबंधित प्रगतीची माहिती देताना पूर्वांचल एक्स्प्रेस मार्गाचे काम वेगाने सुरु असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तारीघाट-गाझीपूर-महू पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. वाराणसी आणि कोलकाता यामधल्या नुकत्याच सुरु झालेल्या जलमार्गामुळे गाझीपूरलाही लाभ होणार आहे. या प्रकल्पांमुळे या भागातल्या व्यापाराला चालना मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

B.Gokhale/N. Chitale/D. Rane



(Release ID: 1557797) Visitor Counter : 149


Read this release in: English