राष्ट्रपती कार्यालय

एकरुपता हे योगविद्येचा योगविद्येचे सार -राष्ट्रपती

प्रविष्टि तिथि: 28 DEC 2018 6:39PM by PIB Mumbai

"एकरुपता हे योगविद्येचे सार असून योगामुळे केवळ आपले शरीर, मन आणि आत्मा यांचा संयोग होत नाही, तर विविध देशातील अनेकविध समुदायांना एकत्र करण्याचे, एका धाग्यात बांधण्याचे सामर्थ्य योगात आहे"असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. मुंबईतल्या योगविद्या संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते आज बोलत होते। 

योगविद्येला कोणत्याही धर्म किंवा समुदायाशी जोडणे योग्य नाही, ती मानव समुदायाची प्राचीन परंपरा आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. ज्या लोकांना निरामय आयुष्य जगायचे आहे, त्या सर्वांसाठी योगविद्या आहे.  निरोगी व्यक्तीमुळे कुटुंब निरोगी राहतं, समुदाय, समाज आणि पर्यायाने राष्ट्र निरोगी बनतं, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. 

भारतात योगशिक्षण देणाऱ्या अधिकाधिक संस्था स्थापन करुन, कुशल योग शिक्षक निर्माण करणे, ही आपली जबाबदारी आहे, आज भारताने योग जगभर पोहोचवण्यासाठी भारताने राबवलेल्या उपक्रमांमुळे, आज योग जगभरात लोकप्रिय होत आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. 

 यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते 'योगा फॉर ऑल' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या संस्थेचे संचालक हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या संस्थेने योग विद्येबाबत गेल्या 100 वर्षात केलेले संशोधन, अध्ययन आणि प्रयोगांची माहिती या पुस्तकात आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***


(रिलीज़ आईडी: 1557753) आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English