माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रशासकीय पुस्तिकेचे कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते प्रकाशन


सरकारच्या योजना नाविन्यपूर्ण पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवण्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी बजावत आहेत मोलाची कामगिरी-कर्नल राठोड

Posted On: 27 DEC 2018 5:03PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2018

 

माहिती आणि प्रसारण तसेच युवा आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रशासकीय पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

या पुस्तिकेमध्ये मंत्रालय, तसेच पत्र सूचना कार्यालय, जाहिरात आणि दृश्य प्रचार संचालनालय (डीएव्हीपी), रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडिया, दूरदर्शन, एनएसडी-आकाशवाणी, प्रकाशन विभाग, इलेक्ट्रॉनिक मीडिया ॲण्ड मॉनिटरिंग सेंटर, न्यू मीडिया विंग स्वायत्त संस्था अशा सर्व माध्यम एककातील अधिकारी, भारतीय माहिती संस्थेतील अधिकारी यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

सरकारच्या योजना नाविन्यपूर्ण पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवण्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अधिकारी मोलाची कामगिरी बजावत आहेत, अशा शब्दात कर्नल राठोड यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. अधिकारी ठराविक साच्यापलिकडे जाऊन विचार करत असल्याबद्दल आणि विभिन्न विभागांतर्गत समन्वयाने काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावर्षी मोठ्या संघभावनेने काम केले आहे, असे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी सांगितले. इफ्फी किंवा पराक्रम पर्वचे आयोजन, राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांचे प्रकाशन अशा सर्व बाबतीत त्यांनी उत्तम काम केले असल्याचे खरे यांनी सांगितले.

या पुस्तिकेमुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणारे सर्व अधिकारी एकमेकांशी अधिक जोडले जातील आणि देशभरात तैनात 750हून अधिक सर्व अधिकाऱ्यांमध्ये व्यक्तीश: संपर्क अधिक दृढ होतील, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील सहसचिव विक्रम सहाय यांनी सांगितले.

यावेळी पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक सितांशू कार, प्रसारभारतीचे सीईओ शशी शेखर वेंपती, एनएसडी आकाशवाणी महासंचालक इरा जोशी, डीडी न्यूजचे महासंचालक मयंक अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

N.Sapre/S.Kakde/P.Kor

 



(Release ID: 1557469) Visitor Counter : 102


Read this release in: English