अणुऊर्जा विभाग

वार्षिक आढावा 2018: अणुऊर्जा विभाग

Posted On: 14 DEC 2018 9:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2018

 

कैगा निर्मिती केंद्राच्या एकक-एकने 10 डिसेंबर 2018 रोजी 941 दिवसांच्या सततच्या कार्यान्वयाचा विक्रम रचला. यापूर्वी इंग्लंडमधल्या हेशॅम-2 च्या एकक-8 ने 940 दिवसांच्या कार्यान्वयाचा विक्रम केला होता. प्रेशराइज्ड हेवी वॉटर अणुभट्ट्यांची अणुऊर्जा निर्मिती तंत्रज्ञानातील देशाची क्षमता यामुळे सिद्ध झाली. आरेखन, बांधणी, सुरक्षा गुणवत्ता आणि कार्यान्वयन व देखरेख यात एनपीसीआयएलच्या सर्वोत्कृष्टतेचा हा पुरावा आहे.

गुजरातमधील काकरापार आणि राजस्थान स्थापित होणाऱ्या 700 मेगावॅट क्षमतेच्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर अणुभट्ट्यांच्या निर्मितीत प्रगती होत आहे.

गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा केंद्रातील एकक-2, नूतनीकरण, अद्ययावतीकरण आणि सुरक्षाविषयक मानके पूर्ण केल्यानंतर निर्धारित मुदतीच्या साडेतीन महिने आधी सप्टेंबर 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आले.

मार्च 2018 मध्ये फास्ट ब्रीडर टेस्ट अणुभट्टी 30 मेगावॅट क्षमतेसह पूर्णपणे कार्यान्वित झाल्याने एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला.

ट्राम्बे येथील अप्सरा (यू) ही सुधारित जलतरण तलावासारखी अणुभट्टी सप्टेंबर 2018 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. विविध प्रकारच्या आयसोटोप्सच्या मोठ्या प्रमाणावरील निर्मितीसाठी या अणुभट्टीची रचना करण्यात आली आहे. अणु भौतिकशास्त्रज्ञ, पदार्थ वैज्ञानिक आणि अणुभट्टी रचनाकारांसाठी ही अणुभट्टी उपयुक्त आहे.

सायक्लोन 30, भारतातील सर्वात मोठा वैद्यकीय सायक्लोट्रॉन असून 30 MeV बीम तो वितरित करतो. संपूर्ण पूर्व भारतातील रेडिओआइसोटोपची गरज पूर्ण करण्यास हा सायक्लोट्रॉन सक्षम आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशातील प्लॅडिअम 103 आणि जरमॅनिअम 68 ची गरज पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे.

कर्करोगाचे निदान आणि उपचारासाठी 21 रेडिओफार्मास्युटिकल्ससह स्वस्त आणि प्रभावी औषधांचा विकास आणि दोन रेडिओन्यूक्लाइड जनरेटर विकसित करण्यात आले आहेत.

आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याची गती कायम राखण्यासाठी काही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या:-

  • न्यूट्रिनो भौतिकीच्या क्षेत्रात अणुऊर्जा विभागाने अमेरिकेच्या फर्मिलॅबसह आंतर सरकारी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. एप्रिल 2018 मध्ये अमेरिकेच्या ऊर्जामंत्र्यांच्या भारत दौऱ्यात हा करार झाला.
  • ईपीआर तंत्रज्ञानाच्या सहा अणुभट्ट्या स्थापित करण्यासाठी एनपीसीआयएल आणि फ्रान्सची ईडीएफ यांच्यात करार झाला.
  • अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान व नवीनतम शोध याबाबत अणुऊर्जा विभाग आणि कॅनडातील नैसर्गिक संसाधने विभाग यांच्यात फेब्रुवारी 2018 मध्ये करार झाला.
  • प्रशिक्षण आणि क्षमताबांधणीसाठी मार्च 2018 मध्ये व्हिएतनामच्या वीनाटॉमसह सामंजस्य करार करण्यात आला.

सविस्तर माहितीसाठी http://pib.nic.in/PressReleseDetail.aspx?PRID=1555919 संकेतस्थळाला भेट द्या.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar


(Release ID: 1557457) Visitor Counter : 409


Read this release in: English