वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

डीआयपीपीचे स्वच्छ भारत ग्रॅण्ड चॅलेंज पुरस्कार प्रदान

Posted On: 26 DEC 2018 5:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2018

 

1 ते 15 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने (डीआयपीपी) स्वच्छ भारत ग्रॅण्ड चॅलेंज’ पुरस्कारांसाठी अर्ज मागवले होते. देशातील स्टार्ट अप्सच्या नावीन्यपूर्ण उपायांना सन्मानित करण्यासाठी हे पुरस्कार असून त्यासाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जल व सांडपाणी व्यवस्थापन आणि हवा व्यवस्थापन अशी चार क्षेत्रे निश्चित करण्यात आली होती. यासाठी 22 राज्यांमधल्या 70 जिल्ह्यांमधून 165 अर्ज आले.

हवा व्यवस्थापन क्षेत्रात पुण्यातील ‘स्मॉल स्पार्क कन्सेप्टस टेक्नॉलॉजीज प्राइवेट लिमिटेड’ ने द्वितीय पारितोषिक पटकावले.

डीआयपीपीचे सचिव रमेश अभिषेक यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम पुरस्कार दोन लाख रुपयांचा असून द्वितीय पुरस्कार एक लाख रुपयांचा आहे.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1557382) Visitor Counter : 128


Read this release in: English