अर्थ मंत्रालय
नवी दिल्लीत २२ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ३१ व्या बैठकीत कर बदलासंदर्भात शिफारशी करण्यात आल्या
Posted On:
22 DEC 2018 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत २२ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या जीएसटी परिषदेच्या ३१ व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर बदलासंदर्भात पुढील निर्णय घेण्यात आले. सहज आकलन व्हावे यासाठी हे निर्णय या स्वरूपात सादर करण्यात आले आहेत. अधिसूचना/पत्रकाद्वारे नंतर ते जारी केले जातील.
- ज्या वस्तू २८ % कराच्या कक्षेत आहेत त्यावरील करात कपात
अ ) २८ % वरून १८ %
एचएस कोड 8483 अंतर्गत पुलीज, ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रॅन्क्स, गिअर बॉक्सेस वगैरे
मॉनिटर्स आणि ३२ इंच स्क्रीन आकार असलेले टीव्ही
पुनर्वापर केलेले रबरी न्यूमॅटिक टायर्स
लिथियम इऑन बॅटरीच्या पॉवर बँक : लिथियम इऑन बॅटरीवर १८ % कर आहेच. यामुळे पॉवर बँक आणि लिथियम इऑन बॅटरीवरील जीएसटी दरात समानता येईल
डिजिटल कॅमेरे आणि व्हिडिओ कॅमेरा रेकॉर्डर्स
व्हिडिओ गेम कन्सोल्स आणि एचएस कोड 9504 अंतर्गत येणारे अन्य खेळ,
ब) 28% वरून 5%
दिव्यांग व्यक्तींच्या गाड्यांसाठी सुटे भाग आणि अन्य सामान
- अन्य वस्तूंवरील जीएसटी दरात कपात
अ)18% वरून 12%
जुने कॉर्क
नैसर्गिक कॉर्कच्या वस्तू
अग्लोमरेटेड कॉर्क
ब) 18% to 5%
मार्बल विटा दगड
क )12% to 5%
नैसर्गिक कॉर्क
चालताना वापरायची काठी
फ्लाय अश बॉक्स
ड ) 12% वरून ० %:
संगीत पुस्तके
इ )5% वरून ० %
भाज्या ( न शिजवलेल्या/ उकडून किंवा पाण्यात वाफवून शिजवलेल्या ), फ्रोजन , ब्रँडेड, आणि एका विशिष्ट डब्यातल्या
प्रेजर्वेटिव्ह वापरून सुरक्षित ठेवलेल्या भाज्या (उदा. सल्फर डायॉक्साईड गॅस, ब्रायन , सल्फरयुक्त पाणी किंवा अन्य प्रिजर्वेटिव्ह मधील) मात्र लगेच वापरण्यासाठी अयोग्य
३. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आणि अन्य नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प
नवीकरणीय ऊर्जा उपकरणे आणि सुटे भागांसाठी ५ % जीएसटी दराचा प्रस्ताव, (बायोगॅस प्रकल्प, सौर ऊर्जा आधारित उपकरणे, सौर ऊर्जा निर्मिती प्रणाली वगैरे , या प्रकल्पातील अन्य वस्तू आणि सेवांसाठी यापूर्वीचा जीएसटी दर कायम
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी ५ % जीएसटी दर असलेल्या विशिष्ट वस्तू बांधकाम सेवांसह पुरवण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाले.
हा वाद सोडवण्यासाठी परिषदेने ५ % जीएसटी आकारण्यात येणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यावर एकूण किमतीच्या ७०% मूल्य धरले जाईल आणि उर्वरित ३० % मूल्य प्रमाणित जीएसटी दरानुसार आकारले जाईल. अशी शिफारस केली
जीएसटी दरात कपात / सेवांवर सवलत
१०० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी दर २८ % वरून १८ ५ पर्यंत कमी करण्यात येईल आणि १०० रुपयांपर्यंतच्या किमतीच्या तिकीटावरील जीएसटी दर १८ ५ वरून १२ ५ पर्यंत कमी केला जाईल
मालवाहू वाहनाच्या थर्ड पार्टी विमा हप्त्यावरील जीएसटी दर १८ % वरून १२ % पर्यंत कमी
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मूलभूत बचत ठेव खातेदारांना बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवावर कर नाही
धार्मिक तीर्थयात्रेसाठी विनाअधिसुचीत /चार्टर विमानाने प्रवाससावर इकॉनॉमी श्रेणीनुसार म्हणजे ५ % जीएसटी (इनपुट सेवेच्या आयटीसीसह)आकारला जाईल.
***
NS/IJ/SK
(Release ID: 1557084)
Visitor Counter : 168