अल्पसंख्यांक मंत्रालय

‘हुनर हाट’ सारख्या प्रदर्शनातून देशभरातील हस्तकौशल्य कारागीर आणि कलाकारांना सशक्त करण्याचा उपक्रम: मुख्तार अब्बास नकवी

मुख्तार अब्बास नकवी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत “हुनर हाट” प्रदर्शनीचे उद्घाटन

Posted On: 22 DEC 2018 3:19PM by PIB Mumbai

केंद्रातील मोदी सरकारने देशात जाती-धर्म, प्रांत यांचेस्पीडब्रेकरसंपवूनविकासाचा महामार्गतयार केला आहे. “हुनर हाटहा त्याच महामार्गावरच्या प्रवासाचा भाग आहे, जिथे देशभरातील कुशल कामगार-शिल्पकार यांच्या विकास आणि सक्षमीकरणाची गाडी वेगाने धावते आहे, असे मत, केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हंटले आहे. नकवी यांच्या उपस्थितीत, आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेहुनर हाटया प्रदर्शनीचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे देशभरात हाहुनर हाटआयोजित केला जातो, या हुनर हाटमुळे देशातील पारंपारिक कारागिरांच्या कौशल्याला, वस्तूंना बाजारपेठ मिळते, हा उपक्रम कलाकार-शिल्पकारांना रोजगार देत त्याना सक्षम करणारा ठरला आहे, असेही नकवी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामेक इन इंडीया’,’स्टैंड अप इंडिया’,स्टार्ट अप इंडिया ही स्वप्ने साकार करण्यासाठी अत्यंत विश्वसनीय बाजारपेठ म्हणूनहुनर हाटसिद्ध होत आहे, असेही नकवी यावेळी म्हणाले.

गेल्या एक वर्षातहुनर हाटमुळे दीड लाखपेक्षा अधिक कारागीर, हस्तकौशल्य व्यावसायिक आणि शिल्पकारांना तसेच, त्यांच्याशी संलग्न उद्योगांना रोजगार मिळाला आहे. हुनर हाट च्या माध्यमातून, 2019 पर्यत जवळपास 5 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या प्रदर्शनात एकाच जागी देशभरातील शिल्पकार, कारागिरांनी तयार केलेल्या अप्रतिम वस्तू आणि वस्त्रे ग्राहकांना उपलब्ध आहेत. त्याशिवाय, देशभरातील विविध राज्यांचे खाद्यपदार्थ आणि पक्वान्ने यांचा आनंदही खवैय्यांना घेता येईल.

मुंबईत आयोजित या हुनर हाटमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून कारागीर, कलाकार, शिल्पकार आणि पाककृती करणारे कलाकार सहभागी झाले आहेत. यात आसामच्या बांबूच्या वस्तू, झारखंडच्या रेशमी साड्यांचे प्रकार, भागलपुरी सिल्क, लखनवी चिकनकारी, उत्तरप्रदेशच्या सिरमिकच्या वस्तू, सुती, लिनन कपडे, लाख आणि इतर परंपरागत दागिने, पश्चिम बंगालचे कांथा काशिद्याचे कपडे, टेराकोटा, काचेच्या वस्तू, गालिचे, संगमरवरी वस्तू, चंदेरी, माहेश्वरी, जम्मू-काश्मीरच्या वस्तू, राजस्थानच्या हस्तकौशल्याच्या वस्तू आणि कपडे अशी अनेकानेक उत्पादने याहुनर हाटमध्ये आहेत.

त्याशिवाय, पारंपारिक पक्क्वान्ने देखील आहेत, ज्यात महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्यपदार्थ, अवधी पदार्थ, राजस्थानचा दाल बाटी चुर्मा, गुजराती थाळी, केरळचे मलबारी पदार्थ, मध्यप्रदेशातील साबुदाणा खिचडी, पोहे, जिलबी, तामिळ पदार्थ, बिहारची फिरनी, लीट्टी चोखा, बंगाली मिठाया, राजकोटच्या मिठाया यासोबत शेकडो प्रकारचे पान अशा भारतीय पदार्थांची रेलचेल असणारी खाद्यभ्रमंती येथे खवैयांना करायला मिळणार आहे. ओडिशाची सिल्वर फिलीग्रीउत्पादने आणि जगभर प्रशिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरच्या विलो बै यावेळी पहिल्यांदाच या प्रदर्शनात असून, ते एक विशेष आकर्षण ठरले आहे.

या हुनर हाट मध्ये रोज संध्याकाळी, कव्वाली, सुफी संगीत आणि पारंपारिक नृत्यकलांचे कार्यक्रम देखील होणार आहेत, असेही नकवी यांनी सांगितले.

या हुनर हाट मध्ये 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अल्पसंख्याक समाजाचे कारागीर सहभागी झाले आहेत. यात एक कारागीर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तर पाच कारागीर राज्य पुरस्कार मिळवलेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली

कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर 21 ते 31 डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. आज झालेल्या उद्घाटन समारंभात अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री डॉ वीरेंद्र कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

N.Sapre/R.Aghor


(Release ID: 1557053) Visitor Counter : 96


Read this release in: English