शिक्षण मंत्रालय
विद्यापीठांमध्ये पीएचडी पदवीधारकांची नियुक्ती करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम
Posted On:
21 DEC 2018 6:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2018
विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावर थेट नियुक्ती करण्यासाठी पीएचडी पदवीची पात्रता अनिवार्य आहे. तसेच या पदवीधारकांनी जगभरातल्या 500 सर्वोत्तम विद्यापीठांपैकी एका विद्यापीठाची पदवी मिळवली असणे आवश्यक आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी काल राज्यसभेत दिली.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1557016)