जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय
स्वच्छ गंगेचे स्वप्न आता दृष्टीपथात-नितीन गडकरी
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2018 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2018
स्वच्छ गंगेचे स्वप्न आता दृष्टीपथात आले असून गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी युद्ध पातळीवर सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गंगा शुद्धीकरणाच्या ‘नमामी गंगे’ प्रकल्पाअंतर्गत कानपूर येथे आज गडकरी यांच्या उपस्थितीत खासगी कंपन्या आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीबाबत करार झाला. त्यावेळी ते बोलत होते.
‘नमामी गंगे’ अंतर्गत उत्तर प्रदेशात 73 प्रकल्प मंजूर झाले असून त्यांच्यासाठी 9,934 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यापैकी 13 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज करार करण्यात आलेल्या प्रकल्पामुळे गंगा नदीत सोडले जाणारे सर्व सांडपाणी एकाच प्रक्रिया केंद्रातून शुद्ध होऊन सोडले जाणार आहे. गंगा निर्मळ आणि अविरल करण्याचा आमचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु असल्याचे गडकरी म्हणाले. यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी एनसीआर दिल्ली क्षेत्रात 11 प्रकल्प राबवले जात आहेत अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1557014)
आगंतुक पटल : 95
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English