निती आयोग
नीती आयोगाकडून भारताच्या शाश्वत विकासाचा निर्देशांक प्रसिद्ध
Posted On:
21 DEC 2018 3:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2018
भारताच्या शाश्वत विकास उदिृष्टांचा मूलभूत निर्देशांक आज निती आयोगाने प्रसिद्ध केला. 2030 पर्यंत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करताना ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाल्याविषयी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामांचा आढावा या निर्देशांकात घेतला जाईल.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने काही संस्थांच्या मदतीने हा निर्देशांक तयार केला आहे. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठवण्यासाठी लोक, पृथ्वी, समृद्धी, भागीदारी आणि शांतता या पाच घटकांना अनुसरुन ‘सबका साथ, सबका विकास’ करण्याची गरज आहे. शाश्वत विकास आराखड्यानुसार तीन वर्षापूर्वी भारतात विविध कार्यक्रम सुरु करण्यात आले होते. यात विविध सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात विकास करुन हे उदिृष्ट गाठले जाणार आहे.
भारताचा राष्ट्रीय विकास अजेंडाही या आराखड्याशी सुसंगत आहे.
या निर्देशांकानुसार 17 विविध क्षेत्रातल्या शाश्वत विकास उदिृष्टांनुसार यादी बनवण्यात आली आहे. या यादीनुसार महाराष्ट्र शाश्वत विकासाच्या दिशेने काम करतो आहे तर हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, चंडीगढ आणि पुद्दुचेरी ही राज्ये या क्षेत्रात आघाडीवर आहेत.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1556951)