माहिती आणि प्रसारण मंत्रालय

22 डिसेंबर पासून तीन दिवसीय भारत-चीन चित्रपट महोत्सवाला सुरुवात

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2018 5:38PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2018

 

भारतीय आणि चिनी नागरिकांचे परस्पर संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांमधील सांस्कृतिक सामंजस्यही वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारत चीन चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे सिरी फोर्ट सभागृहात 22 ते 24 डिसेंबर या अवधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात एकूण सात चित्रपट दाखविले जाणार आहेत, त्यात चार चिनी आणि तीन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होईल. भारतीय चित्रपटांच्या यादीत  ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटासह ‘दंगल’ या हिंदी आणि ‘माछेर झोल’ या बंगाली चित्रपटाचा समावेश आहे.

इच्छुकांना स्वतःचे छायाचित्र असणारे ओळखपत्र दाखवून या महोत्सवात सहभागी होता येईल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर बैठक व्यवस्था उपलब्ध होईल. महोत्सवासाठी सिरी फोर्ट सभागृहाच्या प्रवेशद्वार क्रमांक पाच मधून प्रवेश दिला जाणार आहे.

 

N.Sapre/M.Pange/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1556846) आगंतुक पटल : 90
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English