माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालय : 2018 वर्षाचा समाप्ती आढावा

Posted On: 19 DEC 2018 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 डिसेंबर 2018

 

सरकारचे काम जनतेपर्यत पोहोचवणारा चेहरा म्हणून माहिती आणि प्रसारण मंत्रालय  महत्वाचे खाते आहे   केंद्र सरकारची धोरणे, योजना आणि कार्यक्रमांविषयी माहिती प्रसारित करण्याचे कार्य हे मंत्रालय करते..

या उद्दीष्टांना पूर्ण करण्यासाठी मंत्रालयाने 2018 मध्ये अनेक उपक्रम राबवले, त्यापैकी खालील ठळक उपक्रमांची माहिती खालीलप्रमाणे .

 

माहिती विभाग

प्रसारमाध्यमांच्या विश्वात एरवी एकेकटे काम करणारे विविध विभाग, जसे, जाहिरात आणि दृक्श्राव्य प्रसिद्धी (डीएव्हीपी), फिल्ड पब्लिसिटी (डीएफपी) आणि सॉन्ग अँड ड्रामा डिव्हिजन (गीत आणि नाट्य विभाग)(एसएंडडीडी) या सगळ्यांना एका सूत्रात जोडून त्यांच्यात सहकार्य निर्माण करण्यासाठी ब्युरो ऑफ आउटरीच आणि कम्युनिकेशन, (जनसंवाद आणि संपर्क विभाग) स्थापन केला.

 वार्षिक भारत 2018 हा संदर्भग्रंथ, हिंदी आणि इंग्रजीतून प्रकाशित करण्यात आला. ही दोन्ही पुस्तके ई-बुक स्वरूपातही  उपलब्ध करुन देण्यात आली आहेत जेणेकरून टॅब्लेट, संगणक, ई-रीडर आणि स्मार्टफोन्स यावर सहज वाचता येतील. .

पत्रकार कल्याण योजनेच्या समितीची पुनर्रचना. या समितीत पहिल्यांदाच पत्रकारांनाही सदस्य केले गेले.सरकारचे प्रतिनिधी म्हणून माहिती प्रसारण सचिव, पत्रसूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक,  संयुक्त सचिव (पी एंड ए),  अशा केवळ तीन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

विकासात्मक, सकारात्मक पत्रकारिता क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या पत्रकारांसाठी दीनदयाल उपाध्याय शिष्यवृत्ती जाहीर केली.

    'रोजगार आणि स्व-रोजगार' या विषयावर ‘योजना’ मासिकाचा विशेषांक जारी करण्यात आला – यात रोजगाराच्या संधी,, उद्योजकता, रोजगारविषयक माहिती यासह; मुद्रा योजना सारख्या कार्यक्रमांच्या यशस्वी कथा देखील या विशेषांकात छापण्यात आल्या आहेत.

  महात्मा गांधींच्या जयंतीच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित  मल्टीमिडीया प्रदर्शनात   ब्युरो ऑफ आउटरीच आणि कम्युनिकेशन विभागाने .महात्मा गांधींच्या जीवनाकार्यावर विशेष प्रदर्शन आयोजित केले होते. यात प्रश्नमंजुषा , महात्मा गांधी यांचे जीवन दर्शविणारी परस्परसंवादी त्रिमिती व्हिडीओ वॉल अशी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये होती . महात्मा गांधींच्या जीवनावरील अनेक पुस्तकेही यावेळी प्रदर्शित करण्यात आली.

  "द रिपब्लिकन एथिक" आणि "लोकतंत्र के सार" ही पुस्तके प्रसिद्ध झालीत –त्याशिवाय, राष्ट्रपती श्री राम नाथकोविंद यांची निवडक भाषणे,हा संपादितसंग्रह प्रकाशन विभाग संचालनालयाने  जारी केला.

 

प्रसारण विभाग 

  दिल्ली येथे 15 व्या एशिया मीडिया समिटचे आयोजन करण्यात आले, 'टेलिंग आऊट स्टोरीज - एशिया अँड मोर, अशी या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेमुळे आशिया क्षेत्रातील  प्रसारमाध्यमात परस्परसंवाद आणि सहकार्याला चालना मिळाली

   ऍमेझॉन ऍलेक्सा स्मार्ट स्पिकर्सवर ऑल इंडिया रेडिओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करण्यात आली. यातून संवादाच्या जुन्या आणि आधुनिक स्वरुपाचा संगम साधला गेला. या उपक्रमाचा लाभ परदेशातील भारतीय समुदायालाही होईल कारण आता जगातील कुठल्याही भागातून कोणीही एलेक्साच्या माध्यमाने आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकेल      

ईशान्य भारतातील विकासाच्या बातम्याचे वृत्त्तांकन करण्यासाठी, चार ठिकाणी म्हणजे गंगटोक, कोहिमा, इंफाळ आणि आगरतला इथे तर आणखी पाच ठिकाणी अशा ९ ठिकाणी  दूरदर्शनच्या डीएसएनजी व्हॅन  पाठवण्यात आल्या. त्यांच्याद्वारे दुर्गम भागात झालेया विकासाच्या गाथा लोकांपर्यत पोहोचल्या.

 

चित्रपट विभाग:

 भारत आणि इस्राएल यांच्यात चित्रपट सहकार्य करारावर स्वाक्षरी – दोन्ही देशातील कला आणि संस्कृती ची देवघेव, परस्परांविषयी सद्भावना आणि एकमेकाना समजून घेण्यासाठी या करार उपयुक्त ठरेल.  त्याशिवाय चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्याचा उपयोग होईल..कलात्मक, तांत्रिक तसेच तंत्रज्ञानातील कर्मचा-यांमध्ये रोजगार निर्मिती करण्यासही या करारामुळे मदत होईल.

  65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन - दिवंगत अभिनेता विनोद खन्ना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला; हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचापुरस्कार तर रिद्धी सेन यांना नगरकीर्तन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, आसामी चित्रपट व्हिलेज रॉकस्टार्सला  सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा  आणि बाहुबली चित्रपटाला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.  मल्याळी चित्रपट भयानकम साठी जयराज यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला.

आसियान इंडिया चित्रपट महोत्सवाचे दिल्लीत आयोजन-आसियान देश आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक बंध अधिक मजबूत करण्यासाठी हा महोत्सव अत्यंत उपयुक्त ठरला. यातून जनतेचा परस्परांशी संवाद वाढला. विशेषतः युवकांमधील कला  आणि सांस्कृतिक विषयांची देवघेव यामुळे झाली.

 फिल्म सुविधा कार्यालयाद्वारे चित्रपट उद्योगातील सेवांना समर्पित वेब पोर्टलचे उद्घाटन: यावर चित्रपट, मालिका, रिएलीटी शो यांच्या  चित्रीकरणासाठी  आणि चित्रपट निर्मिती भारतात उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच परदेशी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना चित्रीकरणाची परवानगी घेण्यासाठी या पोर्टलवर  ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 

मे 2018 मध्ये झालेल्या कान चित्रपट महोत्सवात, भारत आणि फ्रान्स यांच्या इंडिया पॅव्हिलियन आयोजित केले गेले होते .बर्लिन फिल्म महोत्सवात (फेब्रुवारी 2018) आणि टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सप्टेंबर 2018) मध्येदेखील  इंडिया पॅव्हिलियन आयोजित करण्यात आले होते.                      

युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल चे यजमानपद भारताकडे-युरोपीय महासंघाच्या २३ सदस्य राज्यांमधील 24 युरोपीय चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात आले होते.  18 जून ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत, नवी दिल्ली, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, पुणे, पुद्दुचेरी, कोलकाता, जयपूर, विशाखापट्टणम, त्रिचूर, हैदराबाद आणि गोवा यासह 11 शहरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

 

व्हिडिओकित्ता येथे 2018 मध्ये आयोजित रोम चित्रपट महोत्सवातही इंडिया पॅव्हिलियनचे आयोजन:

व्हिडिओकित्ता येथे 2018 मध्ये आयोजित रोम चित्रपट महोत्सवात भारत भागीदार देश होता. व्हर्च्युअल रियलिटी, व्हिडिओ गेमिंग, अॅनिमेशन, फिल्म मेकिंग इत्यादीवर भर देणारा विशेष महोत्सव होता. इंडिया पॅव्हिलियन अॅट व्हिडियोकित्ता 2018 मध्ये भारतीय चित्रपटांचा वारसा,चित्रीकरणासाठी भारतात दिल्या जाणाऱ्या सुविधा, यांची माहिती देण्यात आली. भारतात चित्रीकरणासाठी असलेल्या विविध स्थळांचीही माहिती देण्यात आली.

 

गोव्यामध्ये 4 9 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फीचे आयोजन:

या महोत्सवात इस्त्रायलला विशेष देशाचा दर्जा देण्यात आला होता. तर झारखंडला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. . द अस्पर्न पेपर्स या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली. सर्गेई लोझनित्सा यांनी दिग्दर्शित 'डॉनबास' चित्रपटाला प्रतिष्ठित सुवर्णमयूर पुरस्कार मिळाला. ; लिजो जोस पेलिसिस यांना 'ई मा याऊ' साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला. '; चेंबन विनोद यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अनास्ताशिया पस्तोविटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.डेन वोलमन यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना या महोत्सवाच्या सांगता समारंभात जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor(Release ID: 1556781) Visitor Counter : 357


Read this release in: English