पंतप्रधान कार्यालय

जम्मू काश्मीरच्या नव्याने निवडून आलेल्या सरपंचांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 19 DEC 2018 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2018

 

जम्मू काश्मीरमधल्या नव्याने निवडून आलेल्या 48 सरपंचांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. जम्मू काश्मीर पंचायत परिषदेचे अध्यक्ष शाफीक मीर यांनी या समूहाचे प्रतिनिधीत्व केले.

प्रतिनिधींनी जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत निवडणुका शांततेने आणि यशस्वीतेने पार पाडण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहानाबद्दल पंतप्रधानांचे आभार आणि प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी त्यांच्या सदिच्छा निवडून आलेल्या नव सरपंचांना दिल्या. पंतप्रधानांनी लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि लोककल्याणासाठी कार्य करावे असे सांगितले. त्यांनी सरंपंचाना आश्वासन दिले की, ते आणि त्यांचे सरकार नवप्रतिनिधींच्या खांद्याला खांदा लावून राज्याच्या कल्याणासाठी, जनसमुहाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्य करेल. त्यांनी प्रतिनिधींना लोकांची रुची लक्षात घेऊन प्राथमिकतेवर भर देण्यास सांगितले.

पंतप्रधानांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींचे त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत धैर्याने तोंड देऊन, धमक्या आणि दहशत असताना सुद्धा लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल कौतुक केले. त्यांनी प्रतिनिधींना पंचायत राज मॉडेल यशस्वीपणे राबवण्यासाठी केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे तसेच लोकांच्या पायाभूत गरजा आणि तक्रारी यांना प्रतिसाद देण्यात कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी तळागाळातील संस्थांना जम्मू काश्मीरमध्ये सध्या अवलंबिण्यात येत असलेला हिंसेचा मार्ग तसेच स्थानिक लोकांचा विकास, त्यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन देऊन भरीव कार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1556691) Visitor Counter : 92


Read this release in: English