आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

बिहारमधील पाटणा येथे राष्ट्रीय महामार्ग-19 वरील गंगा नदीवर नवीन चार पदरी पुलाच्या (सध्याच्या एमजी सेतूला समांतर) बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 17 DEC 2018 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, अर्थविषयक केंद्रीय समितीने, बिहार मधील पाटणा येथे राष्ट्रीय महामार्ग-19 वर गंगा नदीवर नवीन चार पदरी पुलाच्या (सध्याच्या एमजी सेतूला समांतर) बांधकामाला मंजुरी दिली आहे. यासाठी  2926.42 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पाचा बांधकाम कालावधी साडेतीन वर्षांचा असून जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हा महाप्रकल्प 14.500 किमी लांब असून बिहारच्या पाटणा, सरन आणि वैशाली जिल्ह्यातून जातो. या  प्रकल्पात सध्याच्या जुन्या एमजी सेतूला समांतर  5634 लांबीचा  मुख्य पूल, चार वेहिक्युलर अंडरपासेस , एक रेल्वे ओव्हरब्रीज , 1580 मीटर लांब एक वायडक्त  , 110 मिटर लांबीचा एक उड्डाणपूल , चार छोटे पूल, पाच बस स्थानके, आणि 13 रस्ते जोडणी  स्थानकांचा समावेश आहे.

गंगा नदीने बिहार राज्याचे उत्तर बिहार आणि दक्षिण बिहार असे विभाजन केले आहे. आणि सध्याचा जुना एमजी सेतू गंगा नदीवरील महत्वाचा पूल असून उत्तर बिहारला पाटणा शहराशी जोडतो. यामुळे नेपाळ, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तर बिहार आणि उत्तर बंगालमधील वाहतूक पाटणा, दक्षिण बिहार आणि झारखंडकडे सुरळीत होऊ शकते.हा जुना पूल चार पदरी असला तरी वाढत्या वाहतुकीमुळे  अतिरिक्त पुलाची आवश्यकता होती.

या नवीन चार पदरी पुलामुळे आठ पदरी वाहतूक व्यवस्था होईल. यामुळे प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सोयीचा होईल. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन सामाजिक-आर्थिक लाभ होईल.

याशिवाय बांधकामादरम्यान सुमारे 20.94 लाख दिवसांचा रोजगार निर्माण होईल.

मे 2014 पूर्वी अलाहाबाद ते फराक्का दरम्यान केवळ 13 पूल होते. गेल्या चार वर्षात अतिरिक्त 20 पुलांचे बांधकाम सुरु अथवा पूर्ण झाले आहे . एकूण 33 पूल झाले असून यापैकी पाच पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 


(Release ID: 1556382) Visitor Counter : 117
Read this release in: English