वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
रबर उत्पादकांना मदत करण्यासाठीच्या उपाययोजना
Posted On:
17 DEC 2018 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2018
केंद्र सरकारने रबर उत्पादकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे:-
- नैसर्गिक रबराच्या आयातीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सुक्या रबराच्या आयातीवर 30 रुपये प्रति किलो असे आयात शुल्क लावले आहे.
- नव्या परवाना नियमानुसार आयात केलेल्या सुक्या रबराच्या वापराचा कालावधी दीड वर्षावरुन सहा महिन्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
- नैसर्गिक रबराच्या आयातीवर चेन्नई आणि न्हावा-शेवा येथे 20 जानेवारी 2016 पासून बंधने घालण्याचा निर्णय परदेश व्यापार महासंचालनालयाने अंमलात आणला आहे.
- केरळासारख्या राज्यांमधे रबराची लागवड वाढावी यासाठी सरकारने अनुदान आणि प्रोत्साहनपर योजना लागू केल्या आहेत.
रबर आधारित उद्योगांसाठी विशेष औद्योगिक पार्क तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर.चौधरी यांनी आज लोकसभेत सांगितले.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1556270)