जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

भूजल उपसासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित 1 जून 2019 पासून लागू होणार

Posted On: 13 DEC 2018 6:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2018

 

राष्ट्रीय हरित लवादाच्या विविध निर्देशांचे पालन करण्यासाठी आणि सध्याच्या भूजल उपसासंबंधी मार्गदर्शक तत्वांमधील त्रुटी दूर करण्यासाठी जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाच्या केंद्रीय भूजल प्राधिकरणाने 12 डिसेंबर 2018 रोजी भूजल उपसासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आहेत. 1 जून 2019 पासून ती लागू होतील.

सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच जल संवर्धन शुल्क संकल्पना सादर करण्यात आली आहे. परिसर, उद्योग आणि भूजल उपशाचे प्रमाण यानुसार ते बदलेल. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात जलसंवर्धन शुल्क अधिक आकारले जाईल.

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सांडपाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन, प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरोधात कारवाई, अनिवार्य जल परीक्षण आदींचा समावेश करण्यात आला आहे.

देशात प्रामुख्याने सिंचनासाठी भूजल उपसा केला जातो.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1555862) Visitor Counter : 254


Read this release in: English