सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

ऑक्टोबर 2018 साठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

Posted On: 12 DEC 2018 6:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2018

 

ऑक्टोबर 2018 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) 132.4 इतका राहिला जो ऑक्टोबर 2017 च्या तुलनेत 8.1 टक्के अधिक आहे. एप्रिल-ऑक्टोबर 2018 मध्ये औद्योगिक विकास दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5.6 टक्के राहिला.

ऑक्टोबर 2018 मध्ये  खाण, निर्मिती आणि वीज क्षेत्रात उत्‍पादन वाढीचा दर ऑक्टोबर 2017 च्या तुलनेत अनुक्रमे  7 टक्के, 7.9 टक्के आणि 10.8 टक्के राहिला. तर एप्रिल-ऑक्टोबर  2018 मध्ये या तिन्ही क्षेत्रांचा उत्‍पादन वृद्धि दर गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत अनुक्रमे  3.8 टक्के, 5.6 टक्के आणि 6.8 टक्के राहिला. या काळात फर्निचरच्या निर्मितीत  41 टक्के इतकी सर्वाधिक वाढ नोंदली गेली.

उपयोग आधारित वर्गीकरण  अनुसार ऑक्टोबर 2018 मध्ये प्राथमिक वस्‍तु (प्राइमरी गुड्स), भांडवली वस्तू ,मध्‍यवर्ती वस्‍तु आणि पायाभूत निर्माण वस्तूंचा वृद्धी दर ऑक्टोबर 2017 च्या तुलनेत अनुक्रमे 6.0 टक्के, 16.8 टक्के 1.8 टक्के आणि 8.7 टक्के राहिला. टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंच्या वाढीचा दर ऑक्टोबर  2018 मध्ये 17.6 टक्के राहिला,. तर बिगर-टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूंचा वृद्धि दर ऑक्टोबर 2018 मध्ये 7.9 टक्के राहिला..

नोव्हेंबर 2018 चा निर्देशांक शुक्रवार 11 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध केला जाईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor 



(Release ID: 1555708) Visitor Counter : 71


Read this release in: English