अवजड उद्योग मंत्रालय

फेम-इंडिया योजना

Posted On: 12 DEC 2018 4:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2018

 

इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत विकासासाठी अवजड उद्योग विभाग 1 एप्रिल 2015 पासून फेम-इंडिया योजना-पहिला टप्पा राबवत आहे. सुरुवातीला ही योजना 30 एप्रिल 2017 पर्यंत होती मात्र नंतर तिला 31 मार्च 2019 पर्यंत किंवा फेम-2 च्या अधिसूचनेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रीक वाहनांना चालना देणे हा फेम-इंडियाच्या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश आहे.

फेम-इंडियाच्या पहिल्या टप्प्याच्या खर्चात 795 कोटींवरुन 895 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1555661) Visitor Counter : 109


Read this release in: English