अर्थ मंत्रालय
आरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती
Posted On:
12 DEC 2018 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2018
केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करत भारतीय प्रशासकीय सेवेतले निवृत्त अधिकारी आणि माजी महसूल सचिव शक्तिकांता दास यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे.
केंद्र सरकारने काल या संदर्भात अधिसूचना जारी केली.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1555654)
अभ्यागत कक्ष : 72