युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

वार्षिक आढावा 2018- क्रीडा विभाग (युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय)

Posted On: 10 DEC 2018 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2018

 

2018 वर्ष हे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. क्रीडा क्षेत्रात भारताला मोठे यश मिळाले. सरकारचे दुहेरी उद्दीष्ट एक म्हणजे क्रीडा प्रतिभेचे संगोपन करणे आणि अगदी सामान्य पातळीवर खेळाडूंची पारख यामुळे सकारात्मक परिणाम समोर आले. भारताने यावर्षी गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धेत 66 पदके, जकार्ता आशियाई स्पर्धेत 69 पदके, पॅरा आशियाई स्पर्धेत 72 पदके अशी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली.

क्रीडा विभागाचे 2018 मधील यश पुढीलप्रमाणे-  

1.         खेलो इंडिया शालेय स्पर्धा 2018:

•          2018 मधील पहिली खेलो इंडिया शालेय स्पर्धा 31 जानेवारी ते 8 फेब्रूवारी 2018 दरम्यान झाली

•          पदक तालिका- 199 सुवर्ण + 199 रौप्य +275 कांस्य पदके

•          खेळाडूंची संख्या:

1.         महाराष्ट्र- 331 खेळाडू

2.         हरियाणा – 388 खेळडू

3.         दिल्ली – 359 खेळाडू

•          स्पर्धेचा एकूण निकाल:

a.         हरियाणा – 38 सुवर्ण, 26 रौप्य 38 कांस्य: एकूण: 102 पदके

b.        महाराष्ट्र - 36 सुवर्ण, 32 रौप्य 43 कांस्य: एकूण: 111 पदके

c.         दिल्ली - 25 सुवर्ण, 29 रौप्य 40 कांस्य: एकूण: 94 पदके

2.         प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मंत्रालयाचा देखावा ठरला सर्वोत्कृष्ठ:

            केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाचा चित्ररथ प्रजासत्ताक दिन 2018 मध्ये केंद्र सरकारच्या मंत्रालय/विभाग गटात सर्वोत्कृष्ठ ठरला.

3.         खेलो इंडिया शालेय स्पर्धा, 2018 मध्ये मोठे यश:

  • 1178 प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना पुढील 8 वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार आणि प्रत्येक खेळाडूवर वार्षिक 5 लाख रुपये खर्च करणार.
  • जलतरण स्पर्धेत, श्रीहरी नटराजने सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले.
  • हरियाणाच्या मनू भाकरने एअर पिस्तुल महिला पात्रता फेरीत 387 गुणांसह नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
  • उत्तर प्रदेशचा अभिषेक सिंग मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला.
  • केरळची अपर्णा रॉय मुलींमध्ये सर्वोत्कृष्‍ट खेळाडू ठरली.  
  1. राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी 10 कोटी (NSDF):

            इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) ने राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी 10 कोटी रुपयांचा तिसरा हप्ता दिला. आयआयएफसीएलकडून राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी एकूण 30 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी बॅडमिंटन, तिरंदाजी आणि पॅरा खेळांच्या प्रसारासाठी वापरला जाणार आहे. 

  1. 2018 राष्ट्रकूल स्पर्धेतील कामगिरी:

            ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 04 ते 15 एप्रिल 2018 दरम्यान झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचा सहभाग होता. या स्पर्धेत भारताने 26 सुवर्णपदकांसह एकूण 66 पदके जिंकली (26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य), स्पर्धेत भारत तिसऱ्या स्थानी राहिला. 2010 पासूनची ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

  1. एलएलआयपीई ला युजीसीकडून कॅटेगरी- I चा दर्जा :

            विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल एज्युकशन, ग्वाल्हेरला सर्वोच्च असा कॅटेगरी- I चा दर्जा दिला.

  1. मौलाना अबुल कलाम आझाद चषकसाठी सुधारीत मार्गदर्शक तत्वे:

            मौलाना अबुल कलाम आझाद चषकासाठीची निवड प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी 8.6.2018 रोजी सुधारीत मार्गदर्शक तत्वांना मंजूरी दिली. पुरस्काराची एकूण रक्कम 10 लाख होती ती वाढवून 15 लाख करण्यात आली.

  1. गुणवत्ताधारक खेळाडूंच्या निवृत्तीवेतनात सुधारणा:

            केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गुणवत्ताधारक खेळाडूंच्या निवृत्तीवेतनात 7.6.2018 रोजी सुधारणा केली. नवीन सुधारणेनूसार, निवृत्तीवेतनाची रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. पॅरा ऑलिम्पिक आणि पॅरा आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंबरोबर निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे.

  1. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती:

            क्रीडा विभागाने 22.7.2018 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि खेलो इंडिया प्रतिभा शोध विकास योजनेसाठी 1178 खेळाडूंना शिष्यवृत्ती प्रदान केली.

  1.  राष्ट्रीय अँटी-डोपींग संस्था (NADA):

2018 च्या मध्यात राष्ट्रकूल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी नाडाने 498 भारतीय खेळाडूंची चाचणी घेतली. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी घेण्यात आलेली ही सर्वात मोठी चाचणी होय. जागतिक अँटी-डोपींग संस्थेने (वाडा) प्रसिद्ध केलेल्या अहवालानूसार अँटी-डोपींग नियमावलीचा भंग करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचे स्थान सहाव्या क्रमाकांवरुन तिसऱ्या क्रमांकावर आले.

  1. राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, मणिपूर:

            क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा प्रशिक्षण अशा सर्व बाबींना प्रोत्साहन देणारे मणिपूरचे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे एकमेव आहे. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते 16.3.2018 रोजी इम्फाळ येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा पार पडला. सध्या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तात्पुरत्या स्वरुपात कुमान लम्पक स्पोर्ट कॉम्प्लेक्स, इम्फाळ येथून कार्यरत आहे.

  1. राष्ट्रीय क्रीडा आणि साहस पुरस्कार 2018:

            राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 सप्टेंबर 2018 रोजी अतिशय प्रतिष्ठेचा असा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार एस. मिराबाई चानू (भारोत्तोलन) आणि विराट कोहली (क्रिकेट) यांना तर द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार 32 खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रदान केले.

तेनझिंग नॉर्वे राष्ट्रीय साहस पुरस्कार 10 जणांना भू साहस, जल साहस आणि एक जीवनगौरव असा प्रदान करण्यात आला. मौलाना अबूल कलाम आझाद चषक गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसरला प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार तीन संस्था- राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, जेएसडब्ल्यू स्टील आणि इशा फाऊंडेशन यांना प्रदान करण्यात आला.  

  1. भारतीय खो खो संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहकार्य:

            केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी खो खो संघाला इंग्लंडमधील पहिल्याच आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी घेतली. मंत्रालयाच्या विद्यमान मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रथमच बदल करुन परवानगी देण्यात आली.

  1. आशियाई स्पर्धा 2018 आणि पॅरा आशियाई स्पर्धा 2018 मध्ये भारतीय क्रीडापटूंची प्रशंसनीय कामगिरी:

जकार्ता आणि पालेम्बाग (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धा 2018 मध्ये भारताने 69 पदकांची कमाई केली (15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य) आणि पदकतालिकेत आठवे स्थान प्राप्त केले. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना 20 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये क्रीडा मंत्रालयाने दिले.

भारत एकूण 72 पदकांसट नवव्या स्थानावर राहिला (15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 33 कांस्य पदक) ही भारताची आशियाई पॅरा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. 

  1. युवा ऑलिम्पिक स्पर्धा:

भारताने 13 पदकांसह 14 वे स्थान प्राप्त केले (3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 1 कांस्य) ब्युनोस आयर्स, अर्जेन्टीनामधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

  1. क्रीडा पटूंना आर्थिक मदत:

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडापटूंसाठी राष्ट्रीय कल्याण निधी (पीडीयूएनडब्ल्यूएफएस) अंतर्गत माजी क्रीडापटूंना मदत केली जाते. 

2018-19 मध्ये खेळाडूंना देण्यात आलेली रक्कम पुढीलप्रमाणे : -

  • रु. 6 लाख, श्री एन. ब्रीज किशोर, जिमनॅस्ट कोच, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु. 5 लाख, सुमीत राभा, माजी फुटबॉलपटू यांच्या कुटुंबियांना, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु. 5 लाख, श्रीमती खैदम कालाम्बिया चानू (तलवारबाजी) वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु. 2 लाख, श्री लक्ष्मी कांत दास, वैद्यकीय उपचारांसाठी
  • रु. 5 लाख, श्री लिंबा राम (तिरंदाजी), वैद्यकीय उपचारांसाठी
  • रु. 5 लाख, श्रीमती गोहेला बोरो, तिरंदाज, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु.5 लाख, श्री अशोक सोरेन, तिरंदाज, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु. 5 लाख, श्रीमती गरीमा जोशी, तिरंदाज, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु. 5 लाख, श्री प्रेम लाल, माजी कुस्तीपटू, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु.10 लाख, श्री हकम सिंग, माजी ऍथलिट, वैद्यकीय उपचारांसाठी.
  • रु.2 लाख, श्रीमती वंदना सूर्यवंशी, माजी ज्युदो खेळाडू, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी.
  • रु.10 लाख, श्री जी. लक्ष्मण, ऍथलिट, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी
  1. 2018 एआयबीए महिलांची जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धा

2018 एआयबीए महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची बॉक्सर मेरी कोमने युक्रेनच्या हाना ओखोताचा पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. मेरी कोम या सुवर्णपदकासह एआयबीए जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत सहा वेळा सुवर्णपदक जिंकणारी महिला बॉक्सर ठरली. पदकतालिकेत भारत तिसऱया स्थानी राहिला.

  1. पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट इन स्पोर्टस:

क्रीडा मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम), रोहतकला दोन वर्षाचा डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट इन स्पोर्टस या अभ्यासक्रमाला मंजूरी दिली.

  1. विद्यीपीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांना एनसीएसएसआर योजनेअंतर्गत पाठिंबा

नॅशनल सेंटर ऑफ स्पोर्टस सायन्सेस अँड रिसर्च (एनसीएसएसआर) योजना क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाचे संशोधन, शिक्षण आणि नवकल्पना रुजवते. क्रीडापटूंची कामगिरी उंचावण्यासाठी ही योजना असणार आहे. या योजनेचे दोन भाग आहेत- एक म्हणजे एनसीएसएसआरची एनआयएस, पतियाला येथे उभारणी करणे आणि दुसरे म्हणजे क्रीडा विज्ञान प्रकाराला निवडक विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय/संस्था/रुग्णालये यात पाठिंबा देणे.

एमवायएएस निवडक विद्यापीठांना 25 कोटी आणि निवडक वैद्यकीय   महाविद्यालय/संस्था/रुग्णालये यांना पाच वर्षाच्या काळासाठी 12.5 कोटी रुपयांची आर्थिक मदत करेल. वैद्यकीय महाविद्यालयाचा क्रीडा वैद्यक विभाग क्रीडा क्षेत्रातील एम डी पदवी आणि डिप्लोमा इन स्पोर्टस मेडिसीन प्रदान करेल.

विद्यापाठाचा क्रीडा विज्ञान विभाग क्रीडा शरीरविज्ञानशास्त्र, क्रीडा रसायनशास्त्र यातील एम.एससी. पदवी प्रदान करेल.

  1. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते आणि त्यांच्या प्रशिक्षकांना रोख रक्कमेची योजना:  या योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये आतापर्यंत रु 11.02 कोटी विजेत्या खेळाडूंना देण्यात आले आहेत.

 

सविस्तर माहितीसाठी http://www.pib.nic.in/PressReleseDetail.aspx?PRID=1555310 संकेतस्थळाला भेट द्या.

 

N.Sapre/S.Thakur/P.Malandkar

 

 



(Release ID: 1555525) Visitor Counter : 368


Read this release in: English