संरक्षण मंत्रालय

अग्नी-5 या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

प्रविष्टि तिथि: 10 DEC 2018 6:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2018

 

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या अग्नी-5 या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओदिशातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे वैज्ञानिक आणि अन्य संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

या क्षेपणास्त्राने या मोहिमेचे सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य केली आहेत. देशाच्या संरक्षण क्षमतेत यामुळे वाढ झाली आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1555414) आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English