पोलाद मंत्रालय
केंद्रीय पोलाद मंत्र्यांच्या हस्ते पोलाद पुरस्कार 2018 चे वितरण
पुढील वर्षीपासून पोलाद उत्पादनांच्या ग्राहकांनाही सुफी ने पुरस्कार द्यावा
संशोधन आणि नवनिर्मिती वर भर देणे पोलाद उद्योगासाठी अत्यावश्यक
भारतीय पोलाद उद्योगाने गुणवत्तेमध्ये सर्वोत्तम होण्याचे ध्येय ठेवायला हवे- चौधरी बिरेंद्र सिंग
प्रविष्टि तिथि:
09 DEC 2018 11:04PM by PIB Mumbai
केंद्रीय पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते स्टील युजर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पोलाद पुरस्कार 2018 चे वितरण करण्यात आले. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार विजेते खालीलप्रमाणे -
|
No.
|
Recipient
|
Award
|
|
1
|
रतन टाटा, अध्यक्ष, टाटा समूह
|
जीवन गौरव पुरस्कार
|
|
2
|
विपुल माथुर, मुख्य कार्यकारी अधिकारी, वेलस्पन कार्य समूह
|
हॉल ऑफ फेम स्टील सीईओ ऑफ द इयर
|
|
3
|
टाटा स्टील्स लिमिटेड
|
स्टील मिल्स स्टील कंपनी ऑफ द इयर
|
|
4
|
महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड
|
स्टील युजर्स स्टील कंपनी ऑफ द इयर
|
|
5
|
पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रायवेट लिमिटेड
|
स्टील मिल्स इंजीनियरींग स्टील कंपनी ऑफ द इयर
|
|
6
|
नरेश स्टील इंडस्ट्रीज प्रायवेट लिमिटेड
|
स्टील ट्रेडर्स इंजीनियरींग स्टील कंपनी ऑफ द इयर
|
|
7
|
जे एस डब्लू स्टील्स लिमिटेड
|
स्पेशल कॅटेगरी सुफी मेक इन इंडिया पुरस्कार
|
|
8
|
एम जंक्शन
|
स्पेशल कॅटेगरी सुफी डिजिटल इंडिया पुरस्कार
|
|
9
|
मेटल स्ट्रीट
|
स्पेशल कॅटेगरी सुफी स्टार्ट अप इंडिया पुरस्कार
|
सरकारने 2030 पर्यंत 300 दशलक्ष टन पोलाद उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. इतर देशात पोलाद वापर कमी होत असताना भारतात मात्र तो वाढतो आहे व त्याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षापासून सुफी ने पोलाद ग्राहकांनाही पुरस्कार द्यावा, असे पोलादमंत्री यावेळी म्हणाले.
पोलादाच्या वापरावर देशाचा विकास ठरतो जागतिक दरडोई पोलाद वापर 208 किलो असताना ग्रामीण भारतात मात्र तो 10 किलो आहे याकडे लक्ष वेधून सिंग म्हणाले की जरी गेल्या चार वर्षात भारतातील पोलाद वापर 56 किलो वरून 68 किलोवर गेला असला तरी भारतात पोलाद वापराला आणखी वाव आहे.
सुफीचे अध्यक्ष निकुंज तुरखिया यांच्याशी साधलेल्या संवादादरम्यान सिंग म्हणाले की राष्ट्रीय पोलाद धोरण प्राथमिक आणि दुय्यम पोलाद क्षेत्राला समान संधी देण्यासाठी तयार करण्यात आले व त्यासाठी BIS मानांकने पोलाद उद्योगाला लागू करण्यात आली आहेत. देशांतर्गत उत्पादन झालेल्या उच्च दर्जाच्या पोलादाला चालना दिल्याने गेल्या वर्षात 6000 कोटींची बचत झाल्याचे ते म्हणाले. पोलाद उद्योगात संशोधनाला वाव देण्यासाठी Steel Research & Technology Mission of India (SRTMI) ची स्थापना करण्यात आली असल्याचे श्री सिंग म्हणाले.
पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना सिंग म्हणाले, मला विश्वास आहे की भारत पोलाद क्षेत्रातील नेतृत्त्व असेच सुरु ठेवेल. भविष्य हे पोलाद धातूचे आहे आणि सर्वांनी एकत्रितपणे काम केले तर पुढील दशक हे भारतीय पोलाद उद्योगाचे असेल. स्टील इंडस्ट्रीमधील सर्वांनी पोलादाच्या उज्ज्वल भविष्याचा संदेश सुदूर पोहोचवण्याची गरज आहे. विविध क्षेत्रातील पोलादाच्या उपयुक्ततेबद्दल विविध क्षेत्रात जनजागृती करण्यासाठी खाजगी क्षेत्राने प्रयत्न करण्याची गरज आहे. सुफी सारख्या संघटना ही कामे करू शकतात. उत्पादन आणि बाजारपेठा विकासासाठीही सुफी सारख्या संस्थांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
पोलाद वापराचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हे खाजगी क्षेत्राचे महत्त्वाचे काम आहे, केवळ पोलादाचे महत्त्व सांगून न थांबता पोलाद क्षेत्रात सतत नवीन संशोधन करण्याची गरज श्री सिंग यांनी व्यक्त केली.
N.Sapre/M.Chopade/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1555374)
आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English