कंपनी व्यवहार मंत्रालय

भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना मोठी संधी-केंद्रीय वित्तमंत्री

Posted On: 07 DEC 2018 6:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018

 

नादारी आणि दिवाळखोरी कायदा 2016 पूर्वी देशांतर्गत खाजगी गुंतवणुकीवर परिणाम होण्याबरोबरच बँकिंग व्यवस्थेत अनुत्पादक मालमत्तेच्या मोठ्या प्रमाणामुळे आर्थिक विकासात अडथळा निर्माण होत होता. याची दखल घेऊन आपल्या सरकारने यासंदर्भात जलदगतीने कायदा आणण्याबरोबरच त्याची तितक्याच वेगाने अंमलबजावणीही केली असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

नादारी आणि दिवाळखोरीसंदर्भातल्या, न्यूयॉर्कमध्ये आयोजित केलेल्या परिषदेला ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित करत होते.

हा कायदा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही अडचणी उद्‌भवल्या मात्र सरकारने प्राधान्याने त्याची दखल घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था असून येत्या दशकात भारताचा विकासदर किमान 7 ते 8 टक्के राहील. भारतीय अर्थव्यवस्थेद्वारे भविष्यातली उज्ज्वल संधी आणि नादारी आणि दिवाळखोरी कायद्याअंतर्गत राबवली जाणारी उचित प्रक्रिया यामुळे भारतात गुंतवणूक करण्याबाबत विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध असल्याचे जेटली म्हणाले. अशा प्रकारच्या भारतातल्या गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आणि हेच योग्य स्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1555241) अभ्यागत कक्ष : 129
Read this releasein: English