उपराष्ट्रपती कार्यालय
युवा डॉक्टरांनी रुग्णांवर सहानुभूतीने उपचार करावेत- उपराष्ट्रपती
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2018 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018
युवा डॉक्टरांनी नैतिकतेचे पालन करण्याबरोबरच कोणत्याही आर्थिक परिस्थितीतल्या प्रत्येक रुग्णांवर करूणा आणि सहानुभूतीने उपचार करावेत असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. एम्सच्या 46 व्या वार्षिक पदवीदान समारंभात ते आज बोलत होते.
नवनवीन प्रगती लक्षात घेऊन त्यानुसार वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात सातत्याने सुधारणा आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण करून त्या सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांचा दर माफक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकीकडे वैद्यकीय पर्यटन जोमाने वाढत आहे, यकृत प्रत्यारोपणापासून ते गुडघे प्रत्यारोपणापर्यंतच्या उपचारासाठी इतर देशातून लोक आपल्या देशात येतात मात्र अनेक भारतीयांच्या आवाक्यात हे उपचार नाहीत असे सांगून सर्व भारतीयांना परवडेल अशा दरात उपचार उपलब्ध करून देण्याची आपण खातरजमा केली पाहिजे असे उपराष्ट्रपती म्हणाले. यादृष्टीने महत्वाचे पाऊल म्हणजे साहित्य आणि उपकरणाऱ्या देशांतर्गत निर्मितीला प्रोत्साहन देणे, विशेषत: मेक इन इंडिया अंतर्गत प्रोत्साहन दिल्यास मौल्यवान परकीय चलनाची बचत होईलच त्याचबरोबर या उपकरणांचा निर्मिती खर्चही कमी होईल असे ते म्हणाले.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1555225)
आगंतुक पटल : 100
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English