पंतप्रधान कार्यालय

दै. जागरणच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जागरण फोरमला केलेले संबोधन

Posted On: 07 DEC 2018 4:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दै. जागरण वृत्तपत्राच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त दै. जागरण फोरमला नवी दिल्ली येथे संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विशेषत: सकाळच्या वृत्त विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या. जे दैनंदिन वृत्तपत्र सकाळी सर्वांकडे वितरित करतात. त्यांनी दै. जागरण वृत्तपत्र समाजामध्ये जागृकतेसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावत असून राष्ट्राच्या पुर्नउभारणीत स्वत:चे योगदान देत आहेत, असे सांगितले. पंतप्रधानांनी स्वत:च्या अनुभवाचा दाखला देत सांगितले की, दै. जागरण हे समाजात आणि देशात परिवर्तनाचे सबळ कार्य करत असून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘स्वच्छ भारत अभियान’ हे या संदर्भातील काही उदाहरणे आहेत. डिजिटल क्रांतीच्या धर्तीवर माध्यमे देशाला कणखर बनवण्यात महत्त्वाची भूमिका साकारू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, नवीन भारताच्या उभारणीत ‘सबका साथ सबका विकास’ ‘किमान सरकार, कमाल सुशासन’ याच्या पायावर समाजबांधणी करण्यात आली आहे. तरुणांना विकासात आपली भागीदारी असल्याचा विश्वास वाटला पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.

त्यांनी असे प्रश्न उपस्थित केले की, देशाला 70 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपला देश मागास का आहे? आपल्या देशातील नागरिकांचे प्रश्न अजूनपर्यंत का सोडवण्यात आले नाहीत? ते म्हणाले की, 70 वर्षामध्ये न पोहचलेली विद्युत जोडणी आता सर्वदूर पोहोचली आहे. आणि जे राज्य रेल्वेला जोडले गेले नव्हते ते आता रेल्वे नकाशावर ठळकपणे दाखवण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी गेल्या 67 वर्षांच्या कालावधीची तुलना स्वत:च्या कार्यकाळाशी (2014-18) केली.

या कालावधीत ग्रामीण घरांमध्ये शौचालयांची संख्या 38 टक्क्यांवरुन 95 टक्क्यांपर्यंत पोहोचली.

ग्रामीण रस्ते जोडणी 55 वरुन 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली

एलपीजी जोडणी एकूण घरांच्या 55 टक्क्यांवरुन 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली

गेल्या चार वर्षात ग्रामीण कुटुंबांना 95 टक्के विद्युत पुरवठा केला गेला असून जो आधी केवळ 75 टक्के इतका होता.

चार वर्षांपूर्वी केवळ 50 टक्के लोकांचे बँक अकाऊंटस् होते, आता जवळपास सर्वांनीच बँकिंग सेवा घेतल्या आहेत.

वर्ष 2014 मध्ये चार कोटी जनता कर परतावा भरत होती आणि येत्या चार वर्षात तीन कोटी जनता कर नेटवर्कला जोडण्यात येतील.

पंतप्रधान म्हणाले की, बाकी सर्व गोष्टी जरी सारख्या असल्या तरी हे परिवर्तन कशामुळे आहे याचा विचार व्हावा. ते पुढे म्हणाले की, दारिद्रय रेषेखालील लोकं या चार वर्षांमध्ये बऱ्यापैकी नागरी सेवा घेत असून ते दारिद्रय रेषेवर येण्यासाठी प्रयत्नात आहेत.

पंतप्रधानांनी लोकांच्या इच्छा पूर्ण करण्याला प्राधान्य असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला, सौभाग्य इत्यादी योजनांद्वारे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले. त्यांनी आयुष्मान भारत योजनेचाही उल्लेख केला.

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आर्थिक गुन्हेगारांना लपण्यासाठी कुठल्याही अभयारण्याचा आसरा मिळायला नको याबाबत प्रस्ताव मांडला.

 

B.Gokhale/P.Kor



(Release ID: 1555192) Visitor Counter : 76


Read this release in: English