निती आयोग
कृत्रिम बुद्धीमत्तेबाबतच्या जागतिक हॅकेथॉनला नीती आयोगाकडून सुरुवात
Posted On:
07 DEC 2018 4:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2018
कृत्रिम बुद्धीमत्ता-सर्वांसाठी या कल्पनेचा आणखी विस्तार करण्यासाठी नीती आयोगाने जागतिक हॅकेथॉनचे आयोजन केले आहे. विकासासाठीच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कल्पक आणि तंत्रज्ञानविषयक मार्ग सुचवावेत हे यामागचे उद्दिष्ट आहे.
या संदर्भात नीती आयोग सिंगापूरच्या पर्लिन या स्टार्ट अप शी सहयोग करत कृत्रिम बुद्धीमत्ता सर्वांसाठी याची सुरुवात करत आहे. यासाठी नीती आयोग, विद्यार्थी, स्टार्ट अप आणि कंपन्यांना आमंत्रित करत आहे.
नीती आयोगाने मुंबईत नोव्हेंबरमध्ये आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धीमत्ता विषयक परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्ता-सर्वांसाठी जागतिक हॅकेथॉनची घोषणा करण्यात आली होती. हे हॅकेथॉन दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 15 जानेवारी 2019 ला तर दुसरा टप्पा 15 मार्च 2019 ला समाप्त होईल. पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या व्यक्तींनाच दुसऱ्या टप्प्यात सहभागी होता येईल.
पहिल्या टप्प्यात आरोग्य सुविधा, नागरीकरण आणि वित्तीय समावेश यासारख्या क्षेत्रात सूचना आणि विचार मागवले जातील. दुसऱ्या टप्प्यात याचा विकास केला जाईल. ‘कृत्रिम बुद्धीमत्ता सर्वांसाठी’ याकरता नोंदणी सुरू असून या संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1555191)