मंत्रिमंडळ

भारत आणि जपान यांच्यातल्या आरोग्य आणि कल्याण क्षेत्रात सहकार्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2018 10:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018

 

आरोग्य सेवा क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यातल्या सहकार्य करार आणि जपानच्या कनागावा सरकार यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली.

 

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्ट

स्वाक्षऱ्या केलेल्या कराराची प्रत मिळाल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्य सुरू करण्यात येईल.

 

प्रभाव

पारंपरिक औषध पद्धती क्षेत्रात उभय देशातले सहकार्य या करारामुळे वृद्धींगत होईल. दोन्ही देशांसाठी हे महत्त्वपूर्ण राहील.

 

खर्च

यामुळे अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार नाही. संशोधन, प्रशिक्षण, बैठका यासाठीचा खर्च आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या अंदाजपत्रकातून भागवला जाईल. पारंपरिक औषध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारताने 14 देशांसमवेत करार केले आहे.

 

पार्श्वभूमी

भारताला पारंपरिक औषधांची समृद्ध परंपरा लाभली आहे. भारत-जपान द्विपक्षीय संबंधांना अध्यात्मिक, सांस्कृतिक अधिष्ठान लाभले आहे. जपानलाही पारंपरिक औषधांची परंपरा असल्याच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये आयुर्वेद आणि योगविषयी औत्सुक्य वाढत आहे.

 

B.Gokhale/N.Chitale /P.Kor


(रिलीज़ आईडी: 1555177) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English