मंत्रिमंडळ
भारत आणि अमेरिका यांच्यात भूविज्ञानातील वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासंबंधी सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2018 11:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि अमेरिका यांच्यात भूविज्ञानातील वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासंबंधी सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. १ नोव्हेंबर २०१८ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्यामुळे दोन्ही देशांच्या संघटनांना उपलब्ध ज्ञानाचे आदानप्रदान करण्यात मदत मिळेल आणि भूविज्ञान क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल. सहकार्याच्या विशेष क्षेत्रात ईको प्रणालि, हवामान अस्थिरता तसेच भूमि उपयोग परिवर्तन, ऊर्जा, खनिज संपत्ती , पर्यावरण, नैसर्गिक आपत्ती, जोखिम ,जल संसाधन, इन्फोर्मेटिक्स आणि डाटा एकीकरण क्षेत्र समाविष्ट आहेत. या करारांतर्गत, तांत्रिक माहितीचे आदान-प्रदान, प्रवास, प्रशिक्षण आणि उभय देशांच्या या क्षेत्रातील संशोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1555113)
आगंतुक पटल : 115
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English