मंत्रिमंडळ

भारत आणि फ्रांस दरम्यान ऊर्जा कार्यक्षमता / ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 06 DEC 2018 11:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि फ्रांस दरम्यान ऊर्जा कार्यक्षमता / ऊर्जा संवर्धन क्षेत्रातील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी हा करार करण्यात आला होता.

प्रमुख प्रभाव :

सामंजस्य करार विज्ञान आणि तंत्रज्ञान करार आहे ज्यात केवळ तंत्रज्ञान सहकार्यात ज्ञानाचे  आदान-प्रदान समाविष्ट आहे. हा करार ऊर्जा सक्षमता वाढवण्यास तसेच मागणी व्यवस्थापनाशी  संबंधित धोरणे, कार्यक्रम आणि तंत्रज्ञान बाबत माहितीचे आदान-प्रदान प्रोत्साहित करेल.

लाभ :

या करारामुळे  ऊर्जा कार्यक्षमतेबाबत जागरूकता निर्माण होईल. यात सीओ2 उत्सर्जन आणि आईएनडीसी साठी वैश्विक उत्सर्जन देखरेखीसाठी जी.एच.जी डाटा संग्रहण, उपयोग आणि विश्लेषण करण्यासाठी तंत्र विकसित होईल. या करारामुळे संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन मिळेल.

                                                      

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1555063) Visitor Counter : 74


Read this release in: English