वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

वार्षिक स्टार्ट अप इंडिया व्हेंचर कॅपिटल परिषद 2018 उद्या गोव्यात

Posted On: 06 DEC 2018 1:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2018

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्याने गोव्यात उद्या वार्षिक स्टार्ट अप इंडिया व्हेंचर कॅपिटल परिषद 2018 आयोजित केली आहे. ‘भारतातल्या कल्पकतेसाठी जागतिक भांडवलाला चालना’ ही यावर्षीची संकल्पना आहे. भारतीय स्टार्ट अप्सना निधीसाठी जगभरातून उपलब्ध असलेल्या संधींचे दर्शन या परिषदेच्या माध्यमातून घडणार आहे. देशात अधिकाधिक जागतिक भांडवल आकर्षित करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. देशातल्या स्टार्ट अपशी संबंधित बाबींना अधिक चालना मिळावी या दृष्टीने सरकार आणि अनुभवी व्हेंचर कॅपिटल फंड व्यवस्थापक यांच्यात चर्चा होण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे.

150 पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होतील अशी अपेक्षा असून सरकारी अधिकारी, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप, जागतिक निधी व्यवस्थापक आणि भारतातल्या उद्योग जगत प्रतिनिधींचा यात समावेश राहील. अमेरिका, चीन, जपान, हाँगकाँग, सिंगापूर या देशातले निधी व्यवस्थापक या परिषदेला हजर राहणार आहेत.

भारतात 14,000 मान्यताप्राप्त स्टार्ट अप्स असून भारत हा मोठा स्टार्ट अप पाया असणारा जगातला तिसरा देश आहे. या स्टार्ट अपमधून या वर्षात 89,000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण झाले असून मान्यताप्राप्त स्टार्ट अप मधून एकूण 1,41,775 रोजगारांची निर्मिती झाली आहे.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1554847) Visitor Counter : 108


Read this release in: English