जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय

स्वच्छ गंगा अभियानाच्या प्रगतीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून समाधान व्यक्त

Posted On: 05 DEC 2018 6:13PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2018

 

स्वच्छ गंगा अभियानाला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्वच्छ गंगा नदीचे देशातल्या जनतेचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन त्यांनी दिली. सर्व संबंधितांच्या सहकार्याने स्वच्छ गंगा अभियानाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि सर्व संबंधितांच्या कठोर परिश्रमाचे फळ साकार होताना दिसत असल्याचे गडकरी म्हणाले. इंडिया वॉटर इम्पॅक्ट समित 2018 या तीन दिवसांच्या परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते.

सरकारने, गंगा नदी प्रदूषित करणाऱ्या सीसामऊ नाल्याच्या दुष्परिणामांपासून कानपूरला मुक्त केले आहे. 140 एमएलडी अस्वच्छ पाणी गंगा नदीत जाण्यापासून थांबवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. इस्रोच्या दूरसंवेदक केंद्राने विकसित केलेल्या ग्रीन गंगा ॲपचे उद्‌घाटनही यावेळी करण्यात आले. नमामि गंगा उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाच्या जिओ टॅगिंगसाठी हे ॲप उपयुक्त आहे.

नमामि गंगे कार्यक्रमासाठी पाच वर्षांकरिता 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगामार्फत 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या 254 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षात 5000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

यमुना, शरयू, गोमती, कोसी, गंडक, दामोदर यासारख्या गंगा नदीच्या उपनद्यांसाठी 26 प्रकल्प हाती देण्यात आल्‍याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी नमामि गंगे कार्यक्रमाद्वारे स्वच्छ गंगा अभियान ही लोक चळवळ करत असल्याबद्दल प्रशंसा केली.

केंद्रीय जलसंसाधन राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी या तीन दिवसांच्या परिषदेतून सामोऱ्या येणाऱ्या कल्पनांचा स्वच्छ गंगा अभियानाला अपार लाभ होईल अशी आशा व्यक्त केली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1554799) Visitor Counter : 88


Read this release in: English