महिला आणि बालविकास मंत्रालय

महिला आणि बालविकास मंत्रालय, बालकांच्या वसतीगृहांसाठी मार्गदर्शक तत्वे आखणार

Posted On: 05 DEC 2018 2:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2018

 

वसतीगृहातल्या बालकांसाठी किमान काळजी निश्चित करणारी मार्गदर्शक तत्वे, महिला आणि बालकल्याण मंत्रालय आखत आहे. जे पालक आपल्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची काळजी घेण्यास सक्षम नाहीत किंवा इतर कारणांमुळे त्यांना आपल्या मुलांना बाल न्याय कायदा 2015 अंतर्गत नोंदणी न झालेल्या वसतीगृहात ठेवणे भाग पडत आहे अशा संदर्भात ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात येत आहेत.

शाळांशी संलग्न वसतीगृहांसह, इतर वसतीगृहात राहणारी बालकंही, सीसीआय अर्थात बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था डे केअर सेंटर यासारख्या सेंटरमधल्या बालकांप्रमाणेच असुरक्षित असण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी त्यांच्या सेवांसाठीचा किमान स्तर राखण्यासाठी आणि वसतीगृहांची ठराविक काळानं तपासणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याचा निर्णय आपल्या मंत्रालयाने घेतल्याचे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे.

बालहक्क संरक्षणासंदर्भातल्या राष्ट्रीय आयोगाने संबंधितांशी चर्चा करूनही मार्गदर्शक तत्व निश्चित करावीत असे निर्देश मंत्रालयाने दिले असून ही मार्गदर्शक तत्वं, बालन्यायविषयक कायदा अथवा बाल न्याय नियमावली अंतर्गत अधिसूचित करण्याचा मंत्रालयाचा विचार आहे असे त्यांनी सांगितले.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1554746) अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein: English